जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

दोन कारखान्यांकडे ऊस नोंद,तरी तोड नाही,शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तालुक्यात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे आणि कर्मवीर शंकरराव काळे असे सहकारातील दोन नामांकित सहकारी साखर कारखाने असताना दोन्हीकडे उसाची नोंद करूनही शेतकऱ्याचा ऊस तोडला गेला नाही यामुळे कोळगाव थडी येथील संतप्त शेतकरी संतोष जनार्दन निंबाळकर यांनी राज्याच्या साखर आयुक्तांना महाराष्ट्र दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.तरीही काहीही उपयोग झाला असल्याचे दिसून आले नाही.मात्र ऐनवेळी तहसीलदार आणि पोलिस अधिकारी यांनी दखल घेतल्याने आत्मदहन टळले असल्याचे उघड झाले आहे.मात्र उभा ऊस उन्हाच्या चटक्याने वाळून गेला असल्याचे उघड झाले आहे.

ऊसतोड न केल्याबद्दल आंदोलनकर्ते संतप्त शेतकरी संतोष निंबाळकर आणि त्यांची भगिनी दिसत आहे.

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांनी या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी प्रादेशिक संचालक (साखर) यांना जावक क्रं.9ब1/459/2026 तारीख 13 मार्च 2026 रोजी पत्रव्यवहार करून नियमोचित कारवाई करावी असे आदेश दिले आहे.तरीही संतोष निंबाळकर या शेतकऱ्यांची आर्त हाक शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून स्वतःला मिरवून घेणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना ऐकू आली नाही हे विशेष !

   साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम वेळेत पूर्ण करावा आणि कार्यक्षेत्रातील एकही ऊस शिल्लक ठेवू नये,असे स्पष्ट निर्देश साखर आयुक्तांनी दिले होते.कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत आणि बिगर नोंदणीकृत ऊस पूर्ण गाळप करावा.जर पूर्वसूचना न देता कारखाने बंद केले आणि ऊस शिल्लक राहिला,तर त्याची वैयक्तिक जबाबदारी संबंधित साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि सरव्यवस्थापक यांच्यावर राहील.ऊसाचे संपूर्णपणे गाळप होईल याचेही नियोजन करावे.एखाद्या कारखान्याकडे अतिरिक्त ऊस शिल्लक राहत असल्यास नजिकच्या कारखान्यांना अतिरिक्त राहणारा संपूर्ण ऊस गाळप करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.ऊस गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही,याची दक्षता घेण्यात यावी असे स्पष्ट आदेश राज्याच्या साखर आयुक्तांनी दिले असताना त्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे कोपरगाव तालुक्यात दिसून आले आहे.त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.या घटनेबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.कारण अशी तक्रार कोळगाव थडी येथील शेतकरी संतोष जनार्दन निंबाळकर यांनीच राज्याचे साखर आयुक्त यांचेकडे केली असल्याचे उघड झाले आहे.याबाबत त्यांनी त्या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी अहिल्यानगर,अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी,पोलिस अधीक्षक अहिल्या नगर,प्रांताधिकारी शिर्डी,तहसीलदार कोपरगाव आदींना 03 मार्च 2026 रोजी दिल्या होत्या.त्याच्या त्यांनी रीतसर पोहच घेतलेल्या आहे.मात्र त्यांची किसी ने एक न सुनी.त्यांचा दोन एकर ऊस आजही तसाच शेतात वाळून,सुकून चालला असल्याचा आरोप करून या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांनी आपली फसवणूक केली असल्याचा आरोप केला आहे.

ऊसतोड न केल्याबद्दल आंदोलनकर्ते संतप्त शेतकरी संतोष निंबाळकर यांची तक्रार ऐकून घेताना नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,चंद्रशेखर कुलथे,पोलिस निरीक्षक संदीप कोळी आदी.

दरम्यान या सुकून चाललेल्या ऊसाचा तोडीसाठी पाठपुरावा करताना संतोष निंबाळकर या शेतकऱ्याचा दुचाकीला अपघात होऊन त्यात तो अपंग बनला असल्याचा आरोप संतोष निंबाळकर यांनी तहसीलदार आणि पोलिस अधिकाऱ्यांसमोर केला आहे.

   दरम्यान या बाबत कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक यांना दिनाक 06 मार्च 2026 रोजी पत्र व्यवहार केला असल्याचे पत्र आमच्या प्रतिनिधींचे हाती आले आहे.तर जिल्हाधिकारी यांनी या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी प्रादेशिक संचालक (साखर) यांना जावक क्रं.9ब1/459/2026 तारीख 13 मार्च 2026 रोजी पत्रव्यवहार करून नियमोचित कारवाई करावी असे आदेश दिले आहे.तरीही या शेतकऱ्यांची आर्त हाक शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून स्वतःला मिरवून घेणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना ऐकू आली नाही हे विशेष ! त्यामुळे त्यांनी संतापून जाऊन शेवट काल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र ऐनवेळी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते आणि कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी त्यात हस्तक्षेप केला असून त्या शेतकऱ्यांस प्रवृत्त केले आहे.त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे मानले जात आहे.

ऊसतोडी अभावी वळून चाललेला ऊस संकल्पित छायाचित्र.

दरम्यान महाराष्ट्रातील बंद असलेले शिवरस्ते,पाणंद रस्ते आणि शेतरस्ते सात दिवसात मोकळे करण्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत कडक निर्देश दिले आहेत.मात्र हे आदेश कोपरगाव तालुक्यात केवळ कागदावरच दिसून येत असल्याचे संतोष निंबाळकर या शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून दिसून येत आहे.

   दरम्यान या प्रसंगी  नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी सदर आंदोलनकर्ते शेतकरी संतोष निंबाळकर यांना आणि त्यांच्या भगिनीस लेखी पत्र देऊन आम्ही गट क्रमांक 119  मध्ये घटनास्थळी येऊन पाहणी करून शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी आगामी 05 मे 2024 रोजी दुपारी 04 वाजता येण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.त्यामुळे त्यांनी आपले आंदोलन स्थगित केल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असल्याचे उघड झाले आहे.मात्र ऊस तोड न देणाऱ्या साखर कारखान्यावर साखर आयुक्त कोणती कारवाई करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान याबाबत कोळगाव थडी येथील रहिवासी विनायक शंकरराव राजोळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून माहिती देताना,” संबंधित अपिलार्थी यांचा गट क्रमांक 119 असून त्याचा व आमचा गट क्रमांक 120 व 121 याचा दुरान्वये संबंध नसून त्यांनी त्यांच्या हक्काच्या गटामधून रस्त्याची मागणी करणे आवश्यक आहे. त्यांनी चुकीच्या गट क्रमांकमधून रस्त्याची मागणी केली असल्याने त्यांचे विरुद्ध तहसीलदार यांनी निकाल दिला आहे.त्यामुळे त्यांनी विभागीय अधिकारी यांचेकडे अपील केले होते.तेही नामंजूर केले असून त्यांनी अन्य गट क्रमांकमधून रस्त्याची मागणी करणे आवश्यक असल्याची माहिती दिली असून संतोष निंबाळकर यांचा हा दावा फेटाळला आहे.तर गणेश राजोळे यांनी याच इसमाने आमचे वडील रावसाहेब राजोळे यांना मारहाण केल्याने त्यांचा हात मोडला असल्याचा आरोप केला आहे.

   दरम्यान महाराष्ट्रातील बंद असलेले शिवरस्ते,पाणंद रस्ते आणि शेतरस्ते मोकळे करण्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत कडक निर्देश दिले आहेत.गाव नकाशात (गाव नमुना नंबर १) उपलब्ध असलेले सर्व शिव रस्ते आणि पाणंद रस्ते तात्काळ मोकळे करण्याचे आदेश दिले असून शेतरस्त्यांबाबतच्या आदेशांची अंमलबजावणी ७ दिवसांच्या आत सक्तीची करण्यात आली आहे.तसेच रस्ते बंद करणाऱ्या किंवा अतिक्रमण करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश असताना याचा विदारक अनुभव कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे.यातील हे उदाहरण पुरेसे बोलके मानले जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस पिकाची वाट लागून गेली आहे.याची जबाबदारी कोणता अधिकारी घेणार ? आणि लोकप्रतिनिधी याची दखल येणार का ? असे प्रश्न निर्माण झाले आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close