जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

दुचाकी धडकेत एक ठार,चार जखमी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रूक ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेले इसम भारत दत्तात्रय निंबाळकर (वय-६४) यांना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असून अन्य चार जण जखमी झाले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी त्यांचा मुलगा विनोद भारत निंबाळकर (वय-३१) यांनी दाखल केला आहे.

भारत निंबाळकर हे आपल्या दुचाकी हिरो होंडा पॅशन (क्रं.एम.एच.१७ क्यु.३९५३) वरून दि.१८ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता शिर्डी-लासलगाव या रस्त्या वरून जात असताना कोळपेवाडी शिवारात पटेल वस्ती जवळ समोरून आपल्या दुचाकीवरून क्रं.स्प्लेंडर प्लस (क्रं.एम.एच.१७ डब्ल्यू.६५९१) येणारा आंनदवाडी चांदेकसारे येथील आरोपी नवनाथ भास्कर माळी याने आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाची दुचाकीची जोराची धडक दिली होती.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हा मढी गावाचा रहिवासी असून त्यांचे मयत वडील भारत निंबाळकर हे आपल्या दुचाकी हिरो होंडा पॅशन (क्रं.एम.एच.१७ क्यु.३९५३) वरून दि.१८ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता शिर्डी-लासलगाव या रस्त्या वरून जात असताना कोळपेवाडी शिवारात पटेल वस्ती जवळ समोरून आपल्या दुचाकीवरून क्रं.स्प्लेंडर प्लस (क्रं.एम.एच.१७ डब्ल्यू.६५९१) येणारा आंनदवाडी चांदेकसारे येथील आरोपी नवनाथ भास्कर माळी याने आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाची दुचाकीची जोराची धडक दिली होती. त्यात अपघातात आपले वडील भारत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते.त्यांना शिर्डी येथील रुग्णलयात उपचारार्थ दाखल केले होते.मात्र त्यात त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.

दरम्यान या घटनेत आरोपीचे गादीवर असलेली त्याची पत्नी दोन मुले व तो स्वतः असे चार जण जखमी झाले होते.त्यांची नावे उपलब्ध झाली नाही.या प्रकरणी आधी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची ( क्रं.३३ अन्वये) नोंद केली होती.

दरम्यान यात जखमीचे निधन झाल्याने कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१७६/२०२२ भा.द.वि कलम ३०४(अ),२७९,३३८,४२७ मोटार वहान कायदा कलम १८४ प्रमाणे आरोपी विरुध्द दि.१८ मे रोजी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही.एन.कोकाटे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close