दळणवळण
शिकावू वाहन चालक परवाना देणे पूर्ववत सुरु करा-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथे मागील अनेक वर्षापासून प्रत्येक महिन्याला परिवहन अधिकारी शिबिरे होत असल्यामुळे वाहनधारकांची मोठी सोय होत होती.मात्र श्रीरामपूरच्या परिवहन अधिकाऱ्यांनी या शिबिरांना कात्री लावली आहे.एप्रिल महिन्यापासून नवीन शिकवू वाहन परवाना देण्याची सुविधा बंद केल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.त्यामुळे कोपरगाव सदर सुविधा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्यांच्या परिवहन आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
“परिवहन विभागामार्फत कोपरगाव येथे दर महिन्याला परिवहन अधिकाऱ्यांचे तीन शिबिरे होतात.या शिबिराच्या माध्यमातून शिकवू वाहन परवाना,वाहन परवाना चाचणी,वाहनांची नोंदणी व जुन्या वाहनांचे पुनर्रनोंदणी आदी महत्वाची कामे होत असल्यामुळे वाहनधारकांची मोठी सोय होत होती.परंतु श्रीरामपूर परिवहन विभागाकडून कोपरगावला होणाऱ्या शिबिरात नवीन चालक परवाना देण्याची सुविधा एप्रिल महिन्यापासून अचानकपणे बंद केली आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
त्यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की,”परिवहन विभागामार्फत कोपरगाव येथे दर महिन्याला परिवहन अधिकाऱ्यांचे तीन शिबिरे होतात.या शिबिराच्या माध्यमातून शिकवू वाहन परवाना,वाहन परवाना चाचणी,वाहनांची नोंदणी व जुन्या वाहनांचे पुनर्रनोंदणी आदी महत्वाची कामे होत असल्यामुळे वाहनधारकांची मोठी सोय होत होती. परंतु श्रीरामपूर परिवहन विभागाकडून कोपरगावला होणाऱ्या शिबिरात नवीन चालक परवाना देण्याची सुविधा एप्रिल महिन्यापासून अचानकपणे बंद केली आहे.त्यामुळे ज्या वाहन धारकांना नवीन वाहन चालक परवाना काढायचा आहे त्यांना श्रीरामपूर येथे जाणे गैरसोयीचे होत आहे.
त्यामुळे वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेवून कोपरगावला होणाऱ्या परिवहन अधिकारी शिबिरामध्ये नवीन परवाने देण्याची सुविधा तातडीने पूर्ववत सुरु करण्यासाठी सबंधित विभागाला सूचना कराव्यात अशी मागणी आ. काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.