जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

ऊस दरासाठी,”रास्ता रोको आंदोलन”वाहतूक तेरा तास ठप्प !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी) 

  राहुरी शहरात अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांतर्फे ऊस दराच्या प्रश्नावर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळपासून बेमुदत “रस्ता रोको आंदोलन” सुरू करण्यात आले होते.रस्त्यावर मंडप टाकून टाळ-मृदुंग,बाड-बिस्तरा घेऊन जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनस्थळी आले होते.शेतकऱ्यांनी दुपारी आणि रात्री रस्त्यावरच जेवणाची पंगत केली असल्याचे आढळून आले आहे.

राहुरी शहरात अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांतर्फे ऊस दराच्या प्रश्नावर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळपासून बेमुदत “रस्ता रोको आंदोलन” सुरू करण्यात आले तो क्षण.

” केंद्र सरकारने ऊसाची एफआरपी ३६५० रुपये प्रतिटन जाहीर केली आहे.कायद्याने एफआरपीचे तुकडे करता येत नाही.त्यामुळे साखर कारखान्यांनी पहिली उचल ३हजार ६५० रुपये प्रतिटन देणे बंधनकारक आहे.त्याची जबाबदारी राज्याच्या मुख्य सचिवांची आहे.केंद्र सरकारने देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी परदेशातून ७८ रुपये किलो दराने १० लाख टन साखरेची आयात केली,असताना देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना कमी भाव का दिला जात आहे”-अँड.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.

   अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल ४ हजार रुपये प्रतिटन जाहीर केल्याशिवाय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,असा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे.रात्री उशिरा एक वाजे पर्यंत तोडगा निघाला नव्हता.त्यामुळे आंदोलन सुरूच राहिले.त्यामुळे नगर मनमाड मार्गातील प्रवाशांचे मोठे हाल झाले असल्याचे आढळून आले आहे.

शेतकऱ्यांनी उशीर झाल्याने नगर मनमाड महामार्गावरच आंदोलनस्थळी पंगती धरून आपल्या पोटाची क्षुधा शांत केली असल्याचे दिसून आले आहे ते क्षण.

“साखर कारखानदार गेंड्याच्या कातड्याचे झाले आहेत.शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,वाऱ्यावर सोडणार नाही,असे फक्त सांगतात. कृती करीत नाहीत.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शासनकर्ते आणि विरोधक एकत्र आले.तसे ऊस दराच्या प्रश्नावर एकत्र येऊन कोंडी फोडणे अपेक्षित आहे”- प्रकाश देठे,युवक जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.

   राहुरी येथे सोमवार दिनांक 09 नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे,प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,शेतकरी नेते रवींद्र मोरे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे,शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,जिल्हा सचिव रूपेंद्र काले,राजेंद्र म्हस्के,दिलीप इंगळे,संजय पोटे,अनिल इंगळे,रयत क्रांती संघटनेचे सतीश पवार,वंचितचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके,तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव,पंढरीनाथ पवार आदींसह शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.तर या आंदोलनाला कोपरगाव तालुक्यातून नामदेवराव जाधव,नानासाहेब गाढवे,शिवाजी गायकवाड,गोरक्षनाथ शिंदे,अशोक शिंदे,विजय थोरात,दत्तात्रय थोरात आदीसह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.या शिवाय नेवासा,शेवगाव,श्रीरामपूर आदी तालुक्यातून शेतकऱ्यांनी मोठी हजेरी लावली होती.

दरम्यान या दीर्घकालीन “रास्ता रोको”आंदोलनामुळे दोन्हीबाजूंना वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या,तर दिवाळी सणाला जाण्यासाठी तळमळत असलेले प्रवासी दिसत आहेत.

दरम्यान आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सहकार विभागाचे अधिकारी सुनील खर्डे,अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे,तहसीलदार डॉ.अमित पवार आणि पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याबाबत मध्यस्थीचा प्रयत्न केला.मात्र,केवळ आश्वासनांवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.ऊसदर जाहीर करून मागण्यांबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय महामार्ग मोकळा करणार नाही,अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली होती.त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न तूर्तास निष्फळ ठरले असताना रात्री एक वाजता यावर तोडगा निघाला असून लेखी आश्वासनानंतर उद्या सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आणि साखर कारखानदार यांचे बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केल्याने आंदोलन समाप्त केले असल्याचे उघड झालं आहे.

  यावेळी रवींद्र मोरे म्हणाले,जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला,परंतु ऊस दर जाहीर झाला नाही.ऊस बिलाचा एक रुपया मिळाला नाही. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे.यंदा दुष्काळीमुळे अत्यल्प पाऊस झाला.उसाची वाढ खुंटली.वजन घटले.उत्पादन खर्च वाढला.शेतकरी संकटात आहे.साखरेचा भाव ५५ रुपयांपर्यंत आहे.साखर कारखाने ३००० ते ३२०० पर्यंत भाव देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याच्या तयारीत आहेत.ते आम्हाला मान्य नाही.

  या वेळी ॲड.अजित काळे म्हणाले,” केंद्र सरकारने ऊसाची एफआरपी ३६५० रुपये प्रतिटन जाहीर केली आहे.कायद्याने एफआरपीचे तुकडे करता येत नाही.त्यामुळे साखर कारखान्यांनी पहिली उचल ३६५० रुपये प्रतिटन देणे बंधनकारक आहे.त्याची जबाबदारी राज्याच्या मुख्य सचिवांची आहे.केंद्र सरकारने देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी परदेशातून ७८ रुपये किलो दराने १० लाख टन साखरेची आयात केली,असताना देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना कमी भाव का दिला जात आहे असा सवाल केला आहे.पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यास न्यायालयात शेतकऱ्यांच्या बाजूने विनामूल्य विधीसंघर्ष करणार असल्याचे ॲड.काळे यांनी जाहीर केले आहे त्यांचे उपस्थित आंदोलकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आहे.

   आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख पोलीस पथकासह दिवसभर आणि उशिरा रात्री पर्यंत ठाण मांडून बसले होते.जिल्हा प्रशासनातर्फे आंदोलकांशी कोणताही संवाद साधण्यात आला नाही.त्यामुळे आंदोलन रात्री उशिरा एक वाजे पर्यंत सुरूच राहिले.शेतकऱ्यांनी रस्त्यावरच रात्रीचा मुक्काम करण्याची तयारी केली असताना रात्री साखर आयुक्तांचे प्रतिनिधी हजर झाले होते.त्यांनी साखर कारखानदार आणि पालकमंत्र्यांची दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता बैठक लावून यावर निर्णय घेण्याचे  जाहीर केले आहे.त्यानंतर हे आंदोलन संपवले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close