जाहिरात-9423439946
दळणवळण

…या मतदार संघात रस्त्याच्या २४.३१ कोटीच्या निविदा प्रसिद्ध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव मतदार संघातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एकूण ०९ रस्त्यांच्या २४.३१ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून लवकरच रस्त्याच्या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

मतदार संघातील रस्ते विकासाला गती देण्यासाठी शासनाकडून रस्ते व पुलांसाठी जवळपास २६७ कोटी निधी आणला असल्याचा दावा केला आहे.या निधीतून कोपरगाव शहरासह मतदार संघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून दळण वळणाच्या समस्या मार्गी लागल्या आहेत.शासनाकडून आणलेल्या निधीतून सर्वच रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी व नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असतो.त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या २४.३१ कोटीच्या निविदातून अनेक रस्त्यांची कामे पूर्ण होवून विकासाला गती मिळणार आहे.


  दरम्यान या प्रमुख रस्त्यामध्ये जिल्हा हद्द ते रा.मा.६५ पोहेगाव तालुका हद्द सावळीविहीर रस्ता (प्रजिमा ९८) २ कोटी ०९ लक्ष ४४ हजार,रा.मा.०७ धामोरी रवंदे ब्राम्हणगाव येसगाव पढेगाव दहेगाव बोलका धोत्रे खोपडी रस्ता २ कोटी २६ लक्ष ०१ हजार,रा.म.मा.२२२ तोलारखिंड कोतूळ सावळचोळ संगमनेर तळेगाव कोपरगाव-उक्कडगाव वैजापूर रस्ता(रा.मा.६५) ३ कोटी ८८ लक्ष ९३ हजार,रा.म.मा.८ ते सावळीविहीर प्रजिमा १३ वारी औरंगाबाद जिल्हा हद्द रस्ता ३ कोटी ७० लक्ष ६९ हजार,प्रजिमा ४ अंचलगाव ओगदी शिरसगाव प्रजिमा-१३ रस्ता ०२ कोटी ९८ लक्ष ४५ हजार, प्रजिमा-४ ब्राम्हणगाव टाकळी कोपरगाव कोकमठाण सडे शिंगवे रस्ता (प्रजिमा ९९) २ कोटी ९९ लक्ष ०१ हजार, प्रजिमा-४ कोपरगाव कोकमठाण सडे शिंगवे रस्ता २ कोटी ९९ लक्ष ०८ हजार,नासिक हद्द ते रा.मा.६५ पोहेगाव तालुका हद्द सावळीविहीर रस्ता (प्रजिमा ९८) २ कोटी २८ लक्ष ४० हजार, राज्य मार्ग ७ ते माहेगाव देशमुख रस्ता करणे (ग्रा.मा.) १ कोटी ११ लक्ष ३६ हजार अशा एकूण २४.३१ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.त्यामुळे मतदार संघातील इतर प्रमुख रस्त्यांप्रमाणे या रस्त्यांचा देखील विकास होणार असल्यामुळे नागरिकांनीं समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close