जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

‘विधवा प्रथा’ जन जागृतीचा प्रचार,प्रसार व्हावा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

पतीच्या निधनानंतर कुंकू पुसून गळ्यातील मंगळसूत्र तोडणे,पायातील जोडवे काढणे आदी प्रथा बंद करून स्रीयांची होणारी अवहेलना थांबवावी असे आवाहन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी नुकतेच एका प्रसंगी केले आहे.

या लघु चित्रपटात मुख्य अभिनय करणाऱ्या करिश्मा हलवाई या कोपरगाव शहरातील हलवाई कुटुंबातील प्रसिध्द व्यावसायिक संजीव हलवाई व गोल्डन टच ब्युटी पार्लरच्या संस्थापिका गायत्री हलवाई यांच्या त्या सुकन्या असून त्या स्वतः गोल्डन टच ब्युटी पार्लरच्या संचालिका आहेत.कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे.

दिग्दर्शक डॉ.अशोक गावीत्रे,यांनी डॉ.ए.जी.फिल्म प्रॉडक्शन द्वारे हेरवाड पॅटर्न या लघुचित्रपटाची निर्मिती केली असून कोपरगावची सुकन्या करिश्मा हलवाई विधवेची भूमिका साकारत या प्रथा बंद करण्यात याव्यात यासाठी जन जागृती करत आहे.त्याचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे.त्यावेळी ते बोलत होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”समाजातील सामाजिक,धार्मिक कार्यक्रमात त्यांना सहभागी होऊ दिले जात नाही यांसारख्या अनेक अन्यायकारक प्रथांमुळे प्रतिष्ठेने मानवी जीवन जगणे अवघड होत असते तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचे उल्लंघन होत असते.त्या साठी यांसारख्या प्रथांचे निर्मूलन होणे काळाची गरज बनली आहे यासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत तरी ही यांसारख्या अनेक अनिष्ट प्रथा समाजात आहे.
तसेच कोपरगाव तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातीलही ग्रामपंचायतींनी या प्रथे विरोधी ठराव मंजूर करून समाजात जन जागृती घडवावी आणि या चित्रपटाचा प्रचार,प्रसार करण्यासाठी तालुक्यातील इतर संस्थांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे.असे आवाहन समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन शेवटी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष कोयटे यांनी केले आहे.

करिश्मा हलवाई या शिर्डी येथील स्टॅडम फॅशन शोच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत तसेच ‘बिंबन’ या नावाचा चित्रपट सहा भाषेत तयार होणार असून या चित्रपटात मुख्य कलाकाराची भूमिका साकारणार आहे.त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close