सामाजिक उपक्रम
स्व.काळे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेले सेवानिवृत्त शिक्षक स्व.रामनाथ आसाराम काळे (सर) यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.त्याला तरूणांनी प्रतिसाद दिला आहे.
सदर रक्तदान शिबिर शिर्डी साईबाबा संस्थान रक्तपेढी यांच्या सौजन्याने पार पडले आहे.या रक्तदान शिबिरासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.या शिबिराचे आयोजन स्व.रामनाथ काळे ( सर ) मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते.
या उपक्रमाबद्दल माहेगाव देशमुख परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
जाहिरात-9423439946