जाहिरात-9423439946
धार्मिक

कोपरगावच्या…या उपनगरात नवरात्र उत्सव संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

नवरात्र उत्सवानिमित्त कोपरगाव नजीक असललेल्या जेऊर पाटोदा शिवारातील चंद्रलिलानगर येथील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.

शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण असून.नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो; प्रथम चैत्र महिन्यात आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो.हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

दरम्यान या उत्साहात त्यात रोज संध्याकाळी आरती,प्रसाद,दांडिया,देवीच्या भक्ती गीतांचा कार्यक्रम,जोगवा संपन्न झाला आहे.
साई चंद्रलिला चॅरिटेबल ट्रस्टचे अनिल भाबड यांचा श्री रेणुका माता आरती संग्रह देऊन सन्मानित करताना चंद्रमा कलर फोटो चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भवर,समवेत छायाचित्रकार हेमचंद्र भवर.

नवरात्रीचा उत्सव साजरा करताना स्वच्छता,आरोग्य,वृक्षारोपण आदि संदेश दिला गेला.जीवन जगत असताना नातेसंबंध निसर्ग राष्ट्रप्रेम जपणं महत्वाचे आहे असे विचार या प्रसंगी राजेंद्र भवर यांनी व्यक्त केले.या प्रसंगी अभिषेक भवर,शिव रजपुत,मंगल हेमचंद्र भवर,तेजश्री राजेंद्र भवर,सुनील भाबड आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close