जाहिरात-9423439946
धार्मिक

‘नगरपरिषद’ हा शिर्डीकरांसाठी सुवर्णक्षण ना.काळे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष यांनी केलेल्या प्रयत्नातून शिर्डी नगरपंचायतीला राज्य सरकारकडून नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आला आहे.हा शिर्डीकरांसाठी सुवर्णक्षण असल्याचे प्रतिपादन ना.आशुतोष काळे यांनीं नुकतेच शिर्डी येथे बोलताना केले आहे.

“राज्यासह देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या व कोट्यावधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीला जगभरातून वर्षभर साईभक्त येत असतात.दिवसेंदिवस शिर्डीची लोकसंख्या वाढत असल्यामुळे शिर्डी नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर व्हावे अशी तमाम शिर्डीकरांची इच्छा होती ती या निमित्ताने पूर्ण झाली आहे”-ना.आशुतोष काळे,अध्यक्ष साई संस्थान शिर्डी.

गत काही वर्षापासून शिर्डीची लोकसंख्या वाढत जाऊन ती ३१ हजार पार गेली आहे.त्यामुळे या शिर्डी नगरपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर व्हावे अशी स्थानिक ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी होती.त्याबाबत पाठपुरावा करून नुकतीच राज्य सरकारने त्यास मंजुरी दिली आहे.त्यावेळी नागरिकांनी त्यांचा सत्कार केला होता त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,कैलास कोते,ज्ञानेश्वर गोंदकर,सुधाकर शिंदे,रमेश गोंदकर,राकेश कोते,निलेश कोते,गोविंद कोते,शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर,दत्तात्रय कोते,निलेश शिंदे,अविनाश शेळके,सचिन कोते,आप्पासाहेब कोते,अशोक कोते,महेंद्र शेळके, भागवत कोते,दादासाहेब गोंदकर,प्रमोद गोंदकर,पारेश्वर कोते,मुख्य कार्यकारी अधिकारी काकासाहेब डोईफोडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राज्यासह देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या व कोट्यावधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीला जगभरातून वर्षभर साईभक्त येत असतात.दिवसेंदिवस शिर्डीची लोकसंख्या वाढत असल्यामुळे शिर्डी नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर व्हावे अशी तमाम शिर्डीकरांची इच्छा होती.शिर्डी नगरपरिषदेला विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा.या निधीतून होणारी विकासकामे साईभक्तांना सोयीसुविधा देण्यात परिपूर्ण राहतील.यासाठी शिर्डीकरांची शिर्डी नगरपंचायत नगरपरिषद होण्याची प्रतीक्षा आता संपली आहे.
शिर्डी ग्रामस्थांच्या अनेक वर्षापासूनच्या शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषद करण्याच्या मागणीला साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.काळे यांच्या प्रयत्नातून निश्चितपणे चालना मिळून शिर्डीकरांचे स्वप्नं साकार झाले आहे.त्याबद्दल त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close