जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने शनिवार रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पहाटे ५.३० वा. महामस्तकाभिषेकचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्यासह नगरपरिषदेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी, सफाई मित्र, शिक्षक अशा एकूण ११ उभयंताच्या शुभहस्ते महामस्तकाभिषेक,पूजन,आरती विधीवत संपन्न झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स.१८७० साली शिवजयंती सुरू केली जी पहिली शिवजयंती होती.आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले.२०व्या शतकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली होती ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स.१८७० साली शिवजयंती सुरू केली जी पहिली शिवजयंती होती.आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले.२०व्या शतकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली होती ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली.३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला आहे.कोपरगाव शहरातही उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्यासह नगरपरिषदेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी, सफाई मित्र, शिक्षक अशा एकूण ११ उभयंताच्या शुभहस्ते महामस्तकाभिषेक,पूजन,आरती विधीवत संपन्न झाला आहे.

सदर कार्यक्रमा प्रसंगी पहाटे वातावरण शिवमय झालेले होते.नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,जेष्ठ विधिज्ञ जयंत जोशी,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,यासह नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी,सर्व विभागाचे विभाग प्रमुख,अधिकारी कर्मचारी,नगरपरिषदेच्या माध्यमिक,प्राथमिक शाळांचे शिक्षक, शिक्षिका तसेच नागरिक उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई,ध्वनिक्षेपण व्यवस्था,या वेळी मुख्याधिकारी यांच्या संकल्पने सर्वांसाठी विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या संरक्षण भिंतीकाठी विविध गड किल्ले यांची माहिती फलक तसेच स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीचे काही संदेश फलक ठरले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close