धार्मिक
कोपरगाव तालुक्यात…या गावात वीरभद्र यात्रा
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील श्री राजा वीरभद्र यात्रा महोत्सव आयोजीत केला असल्याची माहिती ग्रामस्थ व पंच कमिटी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असून हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे हरि कीर्तन सकाळी ०९ वाजता आयोजित केले असून याचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थानी केले आहे.
आपल्या मनाविरुद्ध पार्वतीने शिवाशी लग्न केले या रागातून दक्षाने पार्वतीला म्हणजे सतीला आणि शिवाला निमंत्रण दिले नाही.शिवाचे सांगणे अव्हेरून सती यज्ञ समारंभात गेली.तेथे दक्षाने तिची आणि शिवाची निर्भत्सना करणारे शब्द उच्चारले.ते सहन न झाल्याने सतीने योगाग्नी प्रज्वलित करून त्या यज्ञकुंडात देहत्याग केला.शिवाला ही बातमी कळताच त्याचा राग अनावर झाला.त्याने आपल्या जटा जमिनीवर आपटल्या.त्यातून वीरभद्राची उत्पत्ती झाली.शिवाने वीरभद्राला दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा केली.रुद्रगणांना घेऊन वीरभद्र दक्षाकडे गेला आणि त्याला यज्ञकुंडात फेकून दिले.शिवाचा आवडता पार्षद म्हणून वीरशैव पंथात वीरभद्राला मानाचे स्थान देण्यात आले.
वीरभद्र या पात्राची कथा पद्मपुराण आणि महाभारतात मिळते.स्वायंभूव मन्वंतरात दक्ष प्रजापतीने यज्ञ केला.यज्ञासाठी समस्तांना निमंत्रण दिले.मात्र आपल्या मनाविरुद्ध पार्वतीने शिवाशी लग्न केले या रागातून दक्षाने पार्वतीला म्हणजे सतीला आणि शिवाला निमंत्रण दिले नाही.शिवाचे सांगणे अव्हेरून सती यज्ञ समारंभात गेली.तेथे दक्षाने तिची आणि शिवाची निर्भत्सना करणारे शब्द उच्चारले.ते सहन न झाल्याने सतीने योगाग्नी प्रज्वलित करून त्या यज्ञकुंडात देहत्याग केला.शिवाला ही बातमी कळताच त्याचा राग अनावर झाला.त्याने आपल्या जटा जमिनीवर आपटल्या.त्यातून वीरभद्राची उत्पत्ती झाली.शिवाने वीरभद्राला दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा केली.रुद्रगणांना घेऊन वीरभद्र दक्षाकडे गेला आणि त्याला यज्ञकुंडात फेकून दिले.शिवाचा आवडता पार्षद म्हणून वीरशैव पंथात वीरभद्राला मानाचे स्थान देण्यात आले.
या वीरभद्र महाराजांची यात्रा गावोगाव भरते व तेथे भक्तगण त्यांची विधिवत पूजा करून स्तवन करतात.या शिवाय विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतही जागृत देवस्थान म्हणून श्री राजा वीरभद्र प्रसिद्ध आहे.येथे उद्या हा यात्रा महोत्सव ग्रामस्थ व यात्रा समितीच्या वतीने संपन्न होत आहे.
त्यात पहाटे ०५ वाजता कावडी मिरवणूक संपन्न होत आहे.त्या नंतर सकाळी ०७ वाजता श्री राजा वीरभद्र महाराज यांचा महाभिषेक पूजा कार्यक्रम संपन्न होत आहे.तर सकाळी ०९ वाजता प्रसिद्ध प्रबोधनकार व कीर्तनकार ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन संपन्न होत आहे.सायंकाळी ०५ वाजता काठी मिरवणूक व स्थानिक भजनी मंडळाचा जागर कार्यक्रम संपन्न होत आहे.तर गुरुवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ०७ वाजता होईक संपन्न होणार आहे.
तरी संवत्सर व परिसरातील भाविकांनी या कीर्तन सेवेचा व धामिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.