जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

..या खंडोबा मंदिर परिसरात जमावबंदी !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

वाकडी (प्रतिनिधी )

संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत व नगर जिल्ह्याची प्रती जेजुरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा मंदिरातील या वर्षीचा रविवार दि २० डिसेंबर रोजी होणारा चंपाषष्ठी यात्रा उत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व प्रशासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला असल्याची माहिती खंडेराव देवस्थान ट्रस्ट,वाकडी ग्रामपंचायत,यात्रा कमेटी व जय मल्हार प्रेस क्लब यांच्या कडून देण्यात आली आहे

कोरोना साथीमुळे सहा महिने बंद असलेली मंदिर जरी उघडली असली परंतु यात्रा उत्सवाच्या अगोदर गर्दी होत असल्यामुळे व कोरोनाचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खंडेराव देवस्थान ट्रस्टने शासन निर्णय नुसार यात्रा रद्द करून तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे-यात्रा समिती.

वाकडी येथील खंडेराव मंदिरात वर्षभरात तीन यात्रा उत्सव होतात पैकी एकमेव महत्वचा असणारा हा यात्रा उत्सव या वर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे रद्द केला असल्यामुळे अनेक मल्हारी भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे अनेक भाविक मल्हारी महात्म वाचन करून खंडोबा देवाचा उपवास करत देवाच्या यात्रेपर्यंत कांदे व वांगे न खाण्याचा संकल्प करून यात्रेच्या दिवशी कांदे व वांगे वाहून उपवास सोडतात.वाकडीच्या खंडोबा यात्रा उत्सवात कांदा-वांगे वाहण्याचा मान असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक याठिकाणी दर्शनाकरीता येत असतात वाकडी येथील खंडोबा मंदिर परिरसरात अनेक भाविक रोज गर्दी करत असतात त्यात लग्न सराई असताना अनेक भाविक जेजुरी न जाता वाकडी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन तळी भंडारा करून देवाचे दर्शन घेऊन आरती करून पूजन करतात.

दरम्यान दि १२ डिसेंबर रोजी वाकडी ग्रामपंचायत सरपंच,खंडेराय देवस्थान ट्रस्ट यांना प्राप्त झालेल्या जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालय मार्फत राहता तहसीलदार यांच्या लेखी पत्रा नुसार वाकडी येथील खंडोबा मंदिर परिसरात या यात्रेला मागील वर्षीच्या गर्दीचा उच्चांक पाहाता श्री खंडेराय देवस्थान ट्रस्ट वाकडी व ग्रामपंचायत वाकडी यांना याबाबत पत्र देऊन यात्रा उत्सव रद्द करावा या बाबत सुचना दिल्या होत्या.यावर श्री खंडेराय देवस्थान ट्रस्ट यांनी तात्काळ बैठक बोलावून याबाबत निर्णय घेत दि १९ डिसेंबर पासून ते २१ डिंसेबर पर्यंत भाविकांसाठी मंदीरच बंद ठेवण्याचा निर्णय घेत खेळणी दुकाने,कांदा-वांगे विक्रते,प्रसाद विक्रेता,मिठाई विक्रते यासह कुठलीही दुकान मांडण्यास बंदी असून वाघे मंडळी यांना मंदिर परिसरात तळी भंडारा जागरण करण्यास तीन दिवस मनाई केली आहे तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांनी मंदिर परिसरात न येता आपापल्या घरी देवाची तळी भंडारा करावा असे आवाहान यावेळी खंडोबा देवस्थान कडून करण्यात आले आहे

दि १२ डिसेंबर रोजी मिळालेल्या जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कडून मिळलेल्या पत्रानुसार देवस्थान ट्रस्टने त्वरीत कार्यवाही दाखवत याबाबत उपाय योजना सुरु केल्या आहेत याकाळात मंदीर परिसरात पोलीस बंदोबस्त देखिल तैनात असणार असल्याची माहिती अध्यक्ष पंडीतराव लहारे यांनी दिली आहे.या कालावधीत येणारा रविवार २० डिसेंबर रोजीचा आठवडे बाजार बंद असून दि १९ ते २१ डिसेंबर तीन दिवस पर्यंत मंदीर सुद्धा भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे यात्रेच्या एक दिवस आगोदरचा देवाचा छबिन्याचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे.

जगभरातच कोरोनाने थैमान घातले आहे यात्रा हे गर्दीचे मुख्य ठिकाण असते. त्यामुळे हा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे.भाविकांनी नियमाचे पालन करुन कोणीही मंदीर परिसरात गर्दी करु नये असे आवाहान श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट वाकडी ग्रामपंचायत,यात्रा कमेटी,तसेच जय मल्हार प्रेस क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.या बैठकित खंडेराय देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पंडितराव लहारे,सचिव के आर जाधव सर ,विश्वस्त राजेंद्र लहारे, संजय शेळके,गोरक्षनाथ येलम,भाऊसाहेब लबडे,बाळासाहेब लहारे आदी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close