जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

कर्मवीर कारखान्याच्या उपाध्यक्षांची निवड जाहीर !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

  राज्यात सहकारात अग्रणी असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दिनार कुदळे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.मावळते उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.त्यांच्या निवडीबद्दल माजी आ.निवडीनंतर अशोक काळे आणि आ.आशुतोष काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दिनार कुदळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना कारखान्याचे मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे,समवेत अध्यक्ष आ.आशुतोष काळे,निवडणूक निर्णय अधिकारी संजय गोंदे,कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे आदी मान्यवर दिसत आहेत.

“तालुक्याचे सक्षम नेतृत्व अशी ओळख असलेल्या आ.आशुतोष काळे यांनी आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.अशा नेतृत्वासमवेत काम करण्याची संधी मिळणे हा आपला सन्मान आहे.सर्वांना सोबत घेऊन ही जबाबदारी आपण नक्कीच पार पाडू”-दिनार कुदळे,नूतन उपाध्यक्ष,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना,ली.गौतमनगर.

     कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना ली.गौतमनगर,कोळपेवाडी,ता.कोपरगावची स्थापना १९५३ मध्ये स्व.गणपतराव औताडे यांनी केली होती.मूळचा ‘कोपरगाव सहकारी साखर कारखाना’ म्हणून सुरू झालेल्या या संस्थेत कर्मवीर शंकरराव काळे हे संस्थापक संचालक होते.सन -२०१३ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर या कारखान्याचे नाव बदलून ‘कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना’ ठेवण्यात आले आहे.माजी खा.स्व.शंकरराव काळे यांनी सहकार चळवळीचा विस्तार करत शेतकरी व कामगारांच्या हितासाठी या कारखान्याची पायाभरणी केली.स्व.खा.शंकरराव काळे यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन सन-२०१३ मध्ये कारखान्याचे नाव बदलले.वर्तमानात या कारखान्याची प्रतिदिन ऊस गाळप क्षमता सुमारे ४ हजार मेट्रिक टन इतकी मानली जात आहे.या कारखान्यात अध्यक्षपद हे काळे कुटुंबात सर्वाधिक काळ राहिले असले तरी उपाध्यक्ष पद हे आवर्तनासुमार दर वर्षी बदलले जाऊन एक वर्षासाठी ते आपल्या निष्ठावान सहकाऱ्यांना बहाल केले जाण्याची परंपरा स्व.काळे यांनी निर्माण केली होती.ती आजही पाळली जात आहे.दरम्यान आज संपन्न झालेल्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक संजय गोंदे यांनी काम पाहिले आहे.

  दरम्यान आज संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्षपदासाठी कुदळे यांच्या नावाची सुचना सुनील मांजरे यांनी मांडली होती त्याला संचालक राजेंद्र घुमरे यांनी अनुमोदन दिले आहे.

   यावेळी मावळते उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,सूर्यभान कोळपे,राजेंद्र घुमरे,दिलीप बोरनारे,डॉ.मच्छिंद्र बर्डे,सचिन चांदगुडे,राहुल रोहमारे,अनिल कदम,वसंत आभाळे,श्रीराम राजेभोसले,अशोक मवाळ,सुनील मांजरे,मनोज जगझाप,शंकरराव चव्हाण,इंदूबाई शिंदे,वत्सलाबाई जाधव,प्रशांत घुले,गंगाधर औताडे,श्रावण आसने,कारखान्याचे  कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,महाव्यवस्थापक सुनील कोल्हे,आसवणी विभागाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बाबा सय्यद,सहसचिव संदीप शिरसाठ व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close