न्यायिक वृत्त
जिल्हाधिकाऱ्याची चोरी,आरोपींची निर्दोष मुक्तता

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
दिल्ली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शैली कृष्णानी यांची सन-२००९ मध्ये शिर्डी येथे दर्शनासाठी आलेले असताना अज्ञात चोरट्याने ब्लेडच्या सहाय्याने चोरी केली होती.त्यात त्यांचे दीड हजारांची रोख रक्कम, सचिवालयाचे ओळखपत्र,डेबिट कार्ड,आदी वस्तूंची चोरी झाली होती.या प्रकरणी आरोपी म्हणून पंकज देवतारे यास अटक केली होती.याबाबत राहाता येथील प्रथम वर्ग न्यायालयात खटला चालला असून यात आरोपीस न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असल्याची माहिती ऍड.विकास डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

दिली येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी शैली कृष्णा यांनी या प्रकरणी शिर्डी येथील पोलिस ठाण्यात तत्कालीन भारतीय दंड विधान कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पंकज देवतारे हिंगणघाट,वर्धा यास अटक केली होती.त्यास आता निर्दोष मुक्त केले आहे.
शिर्डी येथील साईबाबा देश विदेशात प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी दर्शनासाठी वर्षभरात जवळपास दोन कोटी भाविक भेट देत असताना या ठिकाणी अनेक वर्षापासून शिर्डी पोलिसांचा धाक राहिला नसल्याने चोरट्यांनी हात उचलून घेतला असल्याचे दिसून येत आहे.या ठिकाणी भक्त निवासासाठी ११० कोटींचे दान देणाऱ्या साई भक्त रमणी यांचा खिसा कापल्याचे उदाहरण घडले आहे.अशीच घटना सन- २००९ साली दिनाक ०६ मे रोजी साई मंदिर परिसरात घडली होती.यात दिल्ली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शैली कृष्णा यांचे पर्स मधून वरील रक्कम व साहित्य चोरट्याने आपली अपार लीला दाखवून परागंदा केले होते.घटनेनंतर चोरटे फरार झाले होते.
दिली येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी शैली कृष्णा यांनी या प्रकरणी शिर्डी येथील पोलिस ठाण्यात तत्कालीन भारतीय दंड विधान कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पंकज देवतारे हिंगणघाट,वर्धा यास अटक केली होती.त्याच्यावर गुन्हा दाखल करून तो राहाता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती अं.आ.कुलकर्णी यांचे समोर तो वर्ग करण्यात आला होता.
दरम्यान आरोपींच्या वतीने ऍड.विकास डांगे यांनी काम पाहिले होते.त्यात त्यांनी आरोपी साक्षीदार यांचे जबाब नोंदवले होते.व त्यांची उलट तपासणी केली होती.तर सरकारी पक्षाच्या वतीने ऍड.ए.पी.नागरे यांनी काम पाहिले होते.न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण आरोपी पंकज देवतारे यास निर्दोष मुक्त केले आहे. ऍड.डांगे यांनी ऍड.वेंकटेश ख्रिस्ते यांनी सहकार्य केले आहे.