धार्मिक
गुरूपौर्णिमा उत्सवात ०७ कोटी ०३ लाखांची देणगी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने रविवार दि.०२ जुलै ते मंगळवार दि.०४ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरूपौर्णिमा उत्सवामध्ये रुपये ०७ कोटी ०३ लाख ५७ हजार २४८ इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव उपस्थित होते.
श्री गुरूपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः ०२ लाखहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला.उत्सव कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे ०१ लाख ५४ हजार ९४६ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत ०१ लाख ८८ हजार २०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले.या कालावधीत ३७ लाख ८५ हजार ८०० रूपये सशुल्क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.शिवा शंकर म्हणाले की,”दि.०२ जुलै ते दि.०४ जुलै याकालावधीत रुपये ०७ कोटी ०३ लाख ५७ हजार २४८ प्राप्त झाली आहे.यामध्ये रोख स्वरुपात रुपये ०२ कोटी ८५ लाख ४६ हजार ८८२ दक्षिणा पेटीत प्राप्त झाली असून, देणगी काऊंटर ०१ कोटी १५ लाख ८४ हजार १५० रुपये, साई प्रसादालय देणगी २ लाख ८४ हजार ९४६,पी.आर.ओ.सशुल्क पास देणगी ६७ लाख ३३ हजार ८००, डेबीट क्रेडीट कार्ड ५६ लाख ८३ हजार १३३,ऑनलाईन देणगी ६४ लाख ०५ हजार ७८,चेक डी.डी.देणगी ८० लाख ७४ हजार ८२०, मनी ऑर्डर २ लाख ०९ हजार ०५, सोने ४७२.३०० ग्रॅम रक्कम रुपये २५ लाख ७२ हजार २९७ व चांदी ४.६७९.००० ग्रॅम रक्कम रुपये ०२ लाख, ६३ हजार १३७ यांचा समावेश आहे.
श्री गुरूपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः ०२ लाखहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला.उत्सव कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे ०१ लाख ५४ हजार ९४६ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत ०१ लाख ८८ हजार २०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले.या कालावधीत ३७ लाख ८५ हजार ८०० रूपये सशुल्क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे.उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्तनिवासस्थान,व्दारावती निवासस्थान,साईआश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरीता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला.तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला असे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी शेवटी सांगितले आहे.