धार्मिक
हज यात्रेकरूंचा…या महाराजांनी केला सत्कार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
हज ही मुस्लिम लोकांची यात्रा असून हज यात्रेकरूंचा श्री क्षेत्र भऊर येथील ह.भ.प.संजय महाराज जगताप यांच्या हस्ते गोंधवणी येथे मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला आहे.
प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी असा कुराणामध्ये आदेश आहे.ही एक पवित्र यात्रा समजली जाते त्यामुळे जीवनात एकदा तरी हज यात्रा करावी अशी प्रत्येक मूलसमानाची इच्छा असते.वर्तमानात हज यात्रेकरू समीर गुलाब पठाण व त्यांची पत्नी तस्लिम समीर पठाण हे नुकतेच हज जत्रेसाठी रवाना झाले आहे.भागवत धर्म हा सर्वधर्मीयांचा आदर करतो त्यामुळे त्यांना ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
हज ही मुस्लिम लोकांची यात्रा आहे.ही यात्रा अल-हिज्जाह् या महिन्यामध्ये सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र शहरी भरते.शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी असा कुराणामध्ये आदेश आहे.ही एक पवित्र यात्रा समजली जाते त्यामुळे जीवनात एकदा तरी हज यात्रा करावी अशी प्रत्येक मूलसमानाची इच्छा असते.वर्तमानात हज यात्रेकरू समीर गुलाब पठाण व त्यांची पत्नी तस्लिम समीर पठाण हे नुकतेच हज जत्रेसाठी रवाना झाले आहे.भागवत धर्म हा सर्वधर्मीयांचा आदर करतो त्यामुळे त्यांना ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
संजय महाराज जगताप यांनी पहिल्यांदा आपली पंढरपूर वरीची दिंडी काढलेली आहे.सदरची दिंडी हि गोंधवणी येथे थांबलेली असताना शंकरराव फरगडे यांच्या वस्तीवर दिंडी चहा-पाण्यासाठी थांबलेली असताना हा सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी नंदकुमार लबडे,गणपत काळे,बाबा सोनवणे,शंकर राव फरगडे,अनिल देवकर,जनार्दन भावसार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.