जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

इथेनॉल निर्मिती काँग्रेस राजवटीत मुद्दाम टाळली-रघुनाथ दादा पाटील

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळू नये म्हणून व जागतिक इंधन माफियांच्या दबावातून काँग्रेस राजवटीत इथेनॉल निर्मिती तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांची इच्छा असतानाही मुद्दाम टाळण्यात आली असल्याचा आरोप आज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी आज श्रीरामपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

“स्व.बबनराव काळे यांचे समाजसेवेचे अर्धवट स्वप्न आपण पूर्ण करणार असून पिताश्री अन्याय सहन करत नसत सर्व बाबी दहशतीने मिळत नाही त्या कायदेशीर रित्या मिळवाव्या लागतात हा धडा त्यांनी आपल्याला आजन्म दिला आहे.त्यांनी तत्वांशी कधीच तडजोड केली नाही.शेतकरी संघटनेच्या तत्वाला आपणही सोडचिठ्ठी देणार नाही असे उपस्थितांना आश्वासन दिले व माणसे जोडण्याचे काम पुढे सुरूच ठेवू-अड्.अजित काळे,उपाध्यक्ष शेतकरी संघटना.

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शेतकरी संघटनेचे नूतन उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन रघुनाथ दादा पाटील यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,संघटनेचे उत्तर विभाग प्रमुख बाळासाहेब पठारे,जिल्हा प्रमुख अशोक पठारे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,श्रीरामपूर बाजार समितीचे माजी सभापती दीपक पठारे,अड्.माणिक शिंदे,अड्.अभिजित काळे,अड्.कापसे,प्रसन्न शिंगी,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे,जनार्दन घोगरे,श्रीकांत मापारी,रमेश देशमुख,आकारी पडीत शेतकरी कृती समितीचे शरद आसने,आदी मान्यवरांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आधुनिक काळात स्वच्छ ऊर्जेचा पर्याय पुढे आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे हि बाब नक्कीच चांगली आहे.

गतिमान विकसात प्रत्येक गोष्टीत ऊर्जेची आवश्यकता असते.पाहिजे तेवढ्या प्रमाणात या इंधन ऊर्जेचा पुरवठा होत नाही. विकासासाठी इंधन ही अपरिहार्य बाब आहे.आपल्याला कोळशापासून आणि खनिज तेलापासून उर्जा मिळत असते.खनिज तेल हे वाहतुकीसाठी फार मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते पण त्याचा पुरवठा मर्यादित आहे.भविष्यात नक्कीच मर्यादा येणार आहेत हे ओळखून सर्वजन पर्यायी इंधन स्रोताच्या शोधात आहे.आपल्याकडे भविष्यात सौरउर्जा,पवनउर्जा,इथेनोल,बायोगैस कचरयापासून उर्जा,बायोडिझेल पासून उर्जा आणि समुद्राच्या पाण्यापासून उर्जा इ.उर्जांचा वापर करण्यावर भर दिला आहे.त्यामध्ये जैविक इंधनाचा पर्याय मोठ्या प्रमाणात पुढे आला आहे.काँग्रेस राजवटीत तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी या प्रकरणी पुढाकार घेऊन सुमारे सात लाख कोटींचे परकीय चलन वाचविण्यासाठी इथेनॉलचा पर्याय पुढे आणला होता.मात्र त्यावेळी जागतिक इंधन माफियांनी त्यांच्यावर व काँग्रेस नेत्यांवर दबाव आणला होता.मात्र त्या वेळी या दबावाला बळी पडून काँग्रेसने निर्णय फिरवला होता.त्यामुळे कारखानदारी व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन देशाचे परकीय चलन वाया गेल्याचा आरोप केला.आपण याबाबत पुढाकार घेऊन तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांना निमंत्रित करून पेट्रोलियम परिषद घेतल्याचे स्मरण करून दिले आहे.त्यावेळी तत्कालीन सरकार दारुवाल्यांनी व इंधन माफियांनी विकत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.व यावेळी त्यानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष स्व.बबनराव काळे यांच्या कार्याचे स्मरण केले आहे.व त्यांच्या अभ्यासू वारसा त्यांचे सुपुत्र अड्.अजित काळे यांनी उचलला आहे.हि गौरवांची बाब आहे.अड्.काळे यांनी आपल्या कामातून दिल्ली पासून गल्ली पर्यंत दबदबा निर्माण केला असून शेतकरी व त्यांच्या प्रश्नाचे ते मानधन घेत नाही हि गौरवाची बाब आहे हे निदर्शनास आणले आहे.व राष्ट्रीय सण कसा साजरा करतात यांचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.आता श्रीरामपूर कडे त्यांचे लक्ष राहील त्यांनी आठवड्यातील एक दिवस निश्चित करून शेतकऱ्यांची सेवा करावी.विशेषतः वकिलांचे बरे चालल्यावर ते समाजसेवेकडे लक्ष देत नाही अंतर अड्.काळे हे आपल्या पित्याप्रमाणे अपवाद ठरले असल्याचे गौरवॊद्गार त्यानी शेवटी काढले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक भिमाजी बांद्रे यांनी केले आहे तर यावेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले,अड्,अजित काळे,पत्रकार नानासाहेब जवरे,श्रीकांत मापारी,माजी सभापती दीपक पठारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.उपस्थितांचे अड्.अभिजित काळे यांनी आभार मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close