जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावचे तहसील कार्यालयात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून तहसील कार्यालयातील ध्वजारोहण तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते तर आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेचे ध्वजारोहण या वेळी नगरपरिषदेच्या परंपरेप्रमाणे यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी न करता यावेळी सफाई कर्मचारी नितीन जगताप यांच्या हस्ते करून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव वाढवला आहे.तर भाजप वसंत स्मृती कार्यालयात भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते मुकुंद कालकुंद्री यांच्या शुभ हस्ते करुन जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवला आहे.यावेळी अद्याप जमावबंदीचे कलम लागू असल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गोटातून यावेळी सुरक्षित अंतराची उबळ आल्याचे ऐकू येताना दिसत होते.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने उपनिरीक्षक भारत नागरे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना मानवंदना देण्यात आली आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते.भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर इ.स.१९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स.१९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर इ.स.१९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती.त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे.या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती.या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन भाषण आयोजित केले जाते मात्र यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी वसुंधरा सप्ताहबाबत मार्गदर्शन केले आहे.तर कोपरगाव शहर पोलिसांनी या वेळी उपनिरीक्षक भारत नागरे यांनी मानवंदना दिली आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,कोपरगाव पंचायत समितीचे सभापती पौर्णिमा जगधने,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,उपाध्यक्ष दीपक साळुंके,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष,नगरपरिषदेचे गटनेते विरेन बोरावके,नगरसेवक मेहमूद सय्यद,भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात,माजी नगरसेवक बबलू वाणी,शहराध्यक्ष दत्ता काले,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आदी मान्यवरांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

तर कोपरगाव पंचायत समितीत यावेळी सभापती पौर्णिमा जगधने यांच्या हस्ते करण्यात आले आहे.त्या वेळी उपसभापती अर्जुन काळे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उत्तम पवार,सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,कक्ष अधिकारी श्री.गायकवाड,राजेश डोंगरे आदी उपस्थित होते.तर २९ ग्रामपंचायतीत निवडणुकीत अद्याप आचार संहिता संपलेली नसल्याचे त्या ठिकाणी प्रशासक यांनी तर अन्य ठिकाणी सरपंच यांनी ध्वजारोहण केले असल्याची माहिती गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close