कृषी विभाग
…या तालुक्याला नुकसान भरपाई प्रदान !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने भरपाई जाहीर केली असून त्याचा पहिला हप्ता जिरायती जमिनी साठी ०८ हजार ५०० तर बागायती जमिनीसाठी १७ हजार तर फळबागा साठी २२ हजार ५०० रुपयांनी वर्ग केला त्याची रक्कम ३१.७० कोटी रुपये असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता वर्ग केला आहे.यात जिरायती पिकास ०८ हजार ५०० रुपये तर बागायती क्षेत्रास १७ हजार ५०० रुपयांनी तर फळपिकांना २२ हजार ५०० रुपयांनी वर्ग केला असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे.
राज्यात खूप पाऊस आणि पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले होते.या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत आले होते.म्हणून राज्य सरकारने त्यांना दिवाळी आधी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता.या मदतीतून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारने यात ३५ जिल्ह्यांतील जवळपास ९४ लाख शेतकऱ्यांना एकूण रुपये ७ हजार ,३३७ कोटी ८९ लाख रुपयांची मदत दिली जाईल.

अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वात जास्त ₹८४७.१२ कोटी मदत मिळाली आहे,ज्यामुळे सुमारे ८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.ही पाहिल्या हप्त्याची मदत सध्या रुपये ८,५०० प्रति हेक्टर या दराने दिली जात आहे.तर दुसरा हप्ता राज्य सरकार नंतर देणार आहे.मात्र त्याची तारीख अद्याप अस्पष्ट आहे.
या योजनेत काही जिल्ह्यांना जास्त तर काहींना कमी मदत मिळाली आहे.अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वात जास्त ₹८४७.१२ कोटी मदत मिळाली आहे,ज्यामुळे सुमारे ८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.ही मदत सध्या रुपये ८,५०० प्रति हेक्टर या दराने दिली जात आहे आणि ती फक्त दोन हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठी लागू आहे.नंतर वाढीव एक हेक्टरसाठी आणि रबी हंगामासाठीही वेगळी मदत दिली जाणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता वर्ग केला आहे.यात जिरायती पिकास ०८ हजार ५०० रुपये तर बागायती क्षेत्रास १७ हजार ५०० रुपयांनी तर फळपिकांना २२ हजार ५०० रुपयांनी वर्ग केला असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे.
दरम्यान या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत शेतकरी व नागरीकांच्या असलेल्या तक्रारींची दखल घेवून तहसीलदार महेश सावंत,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बहुमूल्य योगदान दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
——————————
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



