जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

…या तालुक्यात रोहित्र बदलण्यासाठी निधी मंजूर-माहिती

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अतिरिक्त भार असलेले विद्युत रोहित्रे बदलने,काही ठिकाणी नवीन बसविणे तसेच वीज वाहिन्या,पोल व रोहीत्रे स्थलांतरीत करण्यासाठी जवळपास पाऊन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

 

“दरम्यान जवळके परिसरात विजेचा मोठा खेळ खंडोबा झाला असून अवेळी राहाता उपविभागात रांजणगाव देशमुख,जवळके आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर भारनियमन केले जात असून शेतकऱ्यांना बिबट्याच्या भीतीने रात्री बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.त्यामुळे भारनियमन रद्द करावे व रब्बी पिके उभारण्याच्या कामातील अडथळा दूर करावा”- अशोक शिंदे,शेतकरी,जवळके.

   कोपरगाव तालुक्यात वर्तमानात मोठ्या प्रमाणावर खरीप पिके काढण्याचे काम सुरू असून रब्बी पिके उभारण्याची लगीनघाई सुरू आहे.त्यामुळे शेतकऱ्याना विजेची मोठ्या प्रमावणार गरज आहे.त्यातच ऑक्टोबर हीट सुरू झाली असल्याने सर्व उद्योग आणि शेतकरी,घरगुती विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.मात्र त्याच वेळी शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने 420 होल्टचा झटका सुरू केला आहे.वीज कमी दाबाने सुरू असून त्यात अनेक शेतकऱ्याने वीज पंप नादुरुत होत आहे.त्यातच वीज मधूनच गायब होत असून त्यामुळे शेतात जाणे कठीण बनले आहे.आधीच बिबटया आणि वाघ यांच्या भीतीने शेतकरी त्रस्त आहे.रात्रीच्या वेळी भार नियमन होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.त्यामुळे विजेची निर्मिती आणि वितरण व्यवस्था होणे गरजेचे आहे.त्यासाठी विद्युत रोहित्रांची संख्या वाढणे गरजेचे आहे.याची दखल घेऊन आ.काळे यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात जिल्हा नियोजन समितीमधून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला या कामासाठी ७६.३२ लक्ष निधी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

या निधीतून मतदार संघातील कारवाडी येथील ताम्हाणे डी.पी.येथे नवीन ६३ के.व्ही.रोहित्र बसविणे,दहेगाव बोलका येथील पाणी पुरवठा रोहित्र स्थलांतरित करणे,ब्राम्हणगाव येथील वाकचौरे डी.पी.येथे नवीन ६३ के.व्ही.रोहित्र बसविणे,शिंगवे येथील जोशी वस्ती या ठिकाणी नवीन १०० के.व्ही.रोहित्र बसविणे,कोपरगाव बेट भागातील संत जनार्दन स्वामी मंदिर प्रवेशद्वाराजवळील रोहित्र स्थलांतरीत करणे,रवंदे येथील रामदास लामखडे यांच्या वस्तीवरील ११ के.व्ही.वीज वाहिनी स्थलांतरीत करणे,अंजनापूर येथील माऊली डी.पी.येथे नवीन ६३ के.व्ही.रोहित्र बसविणे,तीनचारी (कोकमठाण) येथील ११ के.व्ही.भन्साळी फिडर एच.टी.लाईन स्थलांतरीत करणे,पोहेगाव बु.येथील पिंपळादेवी ते वत्सल मॉडेल स्कूल पर्यंत स्ट्रीट लाईटचे १५ पोल टाकणे,रांजणगाव देशमुख खालकर मळा येथील डि.टी.सी.लाईन स्थलांतरीत करणे,दहेगाव बोलका समाज मंदिर येथील लाईन स्थलांतरीत करणे,धामोरी येथील नारायण मांजरे घराजवळील रोहित्र स्थलांतरीत करणे,धोत्रे वीरभद्र विद्यालय येथील लाईन स्थलांतरीत करणे,भोजडे गावातील सुशीलामाई काळे विद्यालय येथील लाईन स्थलांतरीत करणे आदी कामांचा समावेश आहे.सदर कामे मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी आ.काळे यांचे आभार मानले आहे.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close