कृषी विभाग
‘जागतिक जैव कीटकनाशक शिखर परिषद’ संपन्न-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
किर्गिझस्तान बिश्केक येथे कृषी सूक्ष्मजीव उत्पादक आणि शेतकरी संघटना यांच्या प्रयत्नाने व सेंद्रिय कृषी विभाग,कृषी मंत्रालय,किर्गिझस्तान प्रजासत्ताक यांच्या सहकार्याने पहिली ‘जागतिक जैव कीटकनाशक शिखर परिषद-२०२३’ नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
जैविक कीड नियंत्रण संपूर्ण सजीव सुष्टीचा समतोल राखण्याची निसर्गाची स्वत :ची एक पद्धती आहे.म्हणूनच पिकांसाठी घातक असलेली कीड ह्या निसर्गात आहे,त्याच बरोबर त्याच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी परोपजीवी कीटक व जीवजंतू याच निसर्गात उपलब्ध आहेत.मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.त्यासाठी या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर परिषद हि शाश्वत शेतीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे,भारतीय उत्पादनांना बाजारपेठ मिळून देऊन परकीय चलन देशात आणणे,जैवीक कीटकनाशकांचा वापर वाढवुन रसायनांचा वापर कमी व्हावा व पर्यावरण तसेच मानवी आरोग्य सुधारण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे,उत्पादने विकास व संशोधन कार्यात सहकार्य करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य आदी उद्दिष्टांसाठी आयोजित करण्यात आली होती.भारतामध्ये जैविक शेतीची पाळंमुळे सन-२००० साली रोवली गेले आहे व या संदर्भातील संशोधन होऊन शेतकरी ते वापरात आहेत म्हणूनच भारत सरकारने पूर्वोत्तर सात राज्य सेंद्रिय घोषित करून जगापुढे शेंद्रीय शेतीचे उत्तम उदाहरण ठेवले आहे.रशिया व त्यांची प्रगतिशील मित्र राष्ट्र सध्यातरी भारतीय उत्पादने आयात करून,जैविक किटकनाशके वापरून व रसायने कमी करुन सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्नशील आहे.त्यासाठी किर्गीझस्तान येथे किर्गिझस्तानचे कृषी मंत्री अस्केरबेक झिनेबेकोएव यांचे प्रमुख उपस्थितीत प्रथम ‘जागतिक जैव कीटक नाशक शिखर परिषद’ मोठया उत्साहात आयोजित केली होती.
सदर प्रसंगी ‘आम्मा’चे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,डॉ.प्रशांत धारणकर,प्रख्यात शेती शास्रज्ञ डॉ.एस.एन.सुशील एन.बी.ए.आय.आर.-आय.सी.ए.आर.चे बंगलोर येथील महाव्यवस्थापक,एन,बी.ए.आय.एम.सी.ए.आर.आय.चे माजी प्रमुख व्यवस्थापक डॉ.अनिल सक्सेना,भारताचे प्रकल्प संरक्षक सल्लागार डॉ.जे.पी.सिंह,त्यांचे सहकारी डॉ.के.एल.गुर्जर,डॉ.वंदना सेठ आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी पहिल्या जैविक कीटकनाशक शिखर परिषदेचे प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी,”जैव कीटकनाशकांचा शाश्वत शेती साठी वाढत असलेला उपयोग २०२३ मध्ये १८ ते २० टक्के एवढा मोठा राहील त्यासाठी जागतिक स्तरावर भारत मोठी भूमिका बजावत आहे व इतर राष्ट्रांना देखील याच मार्गाने पुढे जावे लागेल असे सुतोवाच करुन शाश्वत शेतीमध्ये,’बायो पेस्टीसाईड’चा वापर आत्ताच सुरु करावा असे आवाहन केले आहे.’अम्मा असोशिएशन’ ने युरेसियन राष्ट्रांना सहकार्यासाठी मदतीचा हात पुढे केला असल्याचे सांगितले आहे.
या परिषदेत डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे व डॉ.प्रशांत धारणकर यांना,’ ग्लोबल स्टेलवर्ड्स ऑरगॅनिक अवॉर्ड क्रिजिझ येथील डिपार्टमेंट ऑफ ऑरगॅनिक ऍग्रीकल्चर किरगिझ मंत्रालय यांच्या वतीने देण्यात आला आहे.तर ‘अम्मा’चे उपाध्यक्ष डॉ.रामनाथ जगताप,खजिनदार डॉ.विश्वास सोंडकर व संचालक डॉ.लक्ष्मण डोळे यांना,’ग्लोबल ऑरगॅनिक लीडर अवॉर्ड’ ने सन्मानित केले तर ‘अम्मा’ चे प्रमुख मार्गदर्शक डॉ.सी.डी.देवकर,एम.पी.के.व्ही.राहुरी यांना या परिषदेत जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केला गेला आहे.
सदर शिखर परिषदेसाठी,’आशेन इंटरनॅशनल एल.एल.पी.बिशकेक,इन्सेक्टइसाईड इंडिया ली.,नवी दिल्ली,फिलपॅक इंडस्ट्रीस प्रा.ली.ठाणे आणि आय.आय.बी.ए.टी.चेन्नई यांनी प्रायोजित केली होता.या शिखर परिषदेसाठी ‘अम्मा’च्या सर्व सभासदांनी योगदान दिले आहे.शिखरपरिषदेचे सचिव डॉ.प्रशांत धारणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आहे.तर आभार विश्वास सोंडकर यांनी मानले आहे.