संपादकीय
नगराध्यक्ष संधान यांना सावध होण्याची गरज !

न्यूजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
कोपरगाव येथील नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.पराग संधान मित्र मंडळाच्या(!) वतीने माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय,कोपरगाव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र त्यांनी गेल्या आठ महिन्यात आपल्या जवळच्या किती सहकाऱ्यांना गमावले याचे अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोपरगाव तालुक्यात काम न करता श्रेय लाटण्याचा मोठा आणि बरा न होणारा रोग अलीकडील काळात नेत्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना जडला आहे.या शिवाय स्वतः किंवा आपल्या समर्थकांना भरण्यास लावून त्या निविदा आणि ती कामे वाळूसह स्वतःच्या खिशात घालण्याचा आवडीचा छंद लागला आहे.त्याचा मोह सोडला तर कामे दर्जेदार व्हायला वेळ लागणार नाही.मात्र ही बाब वर्तमानात तरी अशक्यप्राय दिसून येत आहे.त्यामुळे आगामी काळ नगराध्यक्ष पराग संधान याच्यासाठी खडतर ठरण्याची शक्यता आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे भाजप कोल्हे गटाचे नगराध्यक्ष पराग संधान हे गेल्या नोव्हेंबर महिन्यात संपन्न झालेल्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडणून आले आहे.त्यांनी आपल्या कालखंडात अनेक समाजोपयोगी कामकाजास सुरुवात केली आहे.त्यात त्यांनी शहरातील बॅनरमुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्याचा प्रयत्न केला आहे.शिवाय शहरातील मोकाट जनावरे आदींचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.अद्याप त्यावर काम सुरू आहे.याशिवाय नवीन उपक्रम सूरू करून नवी दिशा देण्याचे काम सुरू केले आहे.साईबाबा कॉर्नर ते संजीवनी सहकारी साखर कारखाना रस्त्याचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे हस्ते ते आ.विवेक कोल्हे आणि संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे उपस्थितीत शुभारंभ केला आहे.(हा रस्ता खरेच कोणी मंजूर करून आणला हा संशोधनाचाच प्रश्न आहे.मात्र त्याचे श्रेय खा.वाकचौरे यांना जाते असे नागरिकांत बोलले जात आहे) तो रस्ता गुणवत्तेचा व्हावा अशी जनतेची अपेक्षा असून तो पूर्वीच्या ठेकेदाराकडे असल्याने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.कोपरगाव तालुक्यात काम न करता श्रेय लाटण्याचा मोठा आणि बरा न होणारा रोग अलीकडील काळात नेत्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना जडला आहे.या शिवाय स्वतः किंवा आपल्या समर्थकांना भरण्यास लावून त्या निविदा आणि ती कामे वाळूसह स्वतःच्या खिशात घालण्याचा आवडीचा छंद लागला आहे.त्याचा मोह सोडला तर कामे दर्जेदार व्हायला वेळ लागणार नाही.वर्तमानात सहकारी साखर कारखानदारी खाजगी करणाकडे धाव घेत असून त्याची री ओढण्याचे प्रयत्न आता नगरपालिकांमध्ये सुरू झाले आहे.पूर्वी प्रत्येक कामाचे श्रेयासाठी संघटना,केंद्रीय नेते आणि मुख्य संस्था यांचे नावाने श्रेय दिले घेतले जात असे.आता अलीकडील काळात त्याची घसरण होऊन,ती आमचे दादा,भैय्या,साहेब येथपासून सुरू होतं ती कुटुंबाने शहरांसाठी आणि तालुक्यासाठी अमुक अमुक केले इथपर्यंत नीचांकी स्तरावर झाली आहे.

कोपरगाव शहराची पूर्वीची निर्णय क्षमता ही स्थानिक नेतृत्वाकडे सोपवली जात होती.किंबहुना या दोन्ही गडांना येथे चुबुक-डुबुक करण्याची संधीचं मिळत नव्हती.त्यामुळं नगरपालिकेत विकास कामे दर्जेदार होत असत.त्यामुळेच आजही जवळपास पाच ते सहा दशके उलटूनही माजी नगराध्यक्ष जंगुशेठ अजमेरे,माधवराव आढाव,बाळासाहेब सातभाई यांचे नावे आदराने घेतली जात आहेत.मात्र अलीकडील नगराध्यक्ष याला दुर्दैवाने पात्र होताना दिसून येत नाही.मात्र यावर नूतन नगराध्यक्ष पराग संधान खरेच यशस्वी होणार का ? हा खरा यक्ष प्रश्न आहे.
शहराची पूर्वीची निर्णय क्षमता ही स्थानिक नेतृत्वाकडे सोपवली जात होती.त्यामुळं नगरपालिकेत विकास कामे दर्जेदार होत असत.त्यामुळेच आजही जवळपास पाच ते सहा दशके उलटूनही माजी नगराध्यक्ष जंगुशेठ अजमेरे,माधवराव आढाव,बाळासाहेब सातभाई यांचे नावे आदराने घेतली जात आहेत.मात्र अलीकडील नगराध्यक्ष याला दुर्दैवाने पात्र होताना दिसून येत नाही.मात्र यावर नूतन नगराध्यक्ष संधान खरेच यशस्वी होणार का ? हा खरा यक्ष प्रश्न आहे.त्यांनी आपले निर्णय स्वतः घेण्याची गरज आहे,अन्यथा त्यांच्या सहकाऱ्यांची नाराजी ओढवण्याचा धोका वाढून ठेवला आहे.सहकारी आणि पक्षातील असणारे ठेकेदार आता स्थानिक नेतृत्वाला नकोसे झाले असल्याचे संकेत वारंवार दिसून येत आहे.त्यामुळे सत्ताधाऱ्यांची घसरण होण्यास राष्ट्रवादी सारखा त्यांचा विरोधक ही फार दूरची गोष्ट ठरणार आहे.मागील कालखंडात नगराध्यक्ष यांनी आधी स्वतःला अर्थकारणापासून दूर ठेवले असल्याचे दिसून आले होते.त्यांचे कौतुकही होताना दिसत असताना नंतरच्या काळात मात्र त्यांचा तोल ढळला असल्याचे त्यांचे सहकाऱ्यांचाच आरोप झाला होता आणि तो वावगा नव्हता.अशीच गत नगराध्यक्ष पराग संधान यांची व्हायला नको.या बाबत यांनी सावध व्हावयाला हवे.अन्यथा,” प्रत्येक बाब ‘ भैय्या ‘ आणि ‘दादा ‘ यांना विचारावी लागेल” असे प्रत्येक निर्णयाला पालुपाद लागले तर त्यांच्या कार्यात अडचणी आणि गतिरोधक वाढण्याचा धोका वाढून ठेवला आहे.त्यांचे बाबत प्रशासनात नकारात्मक संदेश जाऊ शकतो.आणि बाहुले नगराध्यक्ष अशी प्रतिमा होऊ शकत असल्याचा धोका वाढून ठेवला आहे.आणि वर्तमानात त्याची सुरुवात झाली अशी मानण्यास मोठी जागा आहे.आजच त्यांचे कार्यालयात यांचे सहकाऱ्यांची कमी झालेली गर्दी बरेच काही सांगून जात आहे.त्यांची याबाबत वेळीच जागृत व्हायला हवे.त्यांना व्हिजन कोपरगावचे या कार्यक्रमात शहरातील प्रसिद्ध बिल्डर प्रसाद नाईक यांनी दिलेला सल्ला मोलाचा ठरणार आहे.कारण नगरपरिषद,जिल्हा,विधानसभा,लोकसभा,राज्य सरकार आणि केंद्रात भाजप आणि त्यांच्या पक्षाचे सरकार आहे.आणि शहरात आणि तालुक्यात त्यांनी विरोधक औषधाला ठेवलेला नाही.त्यामुळे आगामी पाच वर्षात त्यांनी विकास दाखवला नाही तर त्यांना तोंड लपविण्यास जागा उरणार नाही.त्यामुळे ही अशी राजकीय स्थिती कोपरगाव शहरात आणि तालुक्यात प्रथमच आलेली आहे.आणि जबाबदारीही नगराध्यक्ष पराग संधान याचे शिरावर तेव्हढीच वाढली आहे.मात्र ते त्याला किती गांभीर्याने घेणार यावर यांचे यश अवलंबून आहे.त्यांना त्यांचे वाढदिवसाचे निमित्ताने ‘न्युजसेवा ‘ कडून खूप खूप सुभेच्छा!



