कामगार जगत
कोपरगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी केला काळ्या फिती लावून शासनाचा निषेध
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील विविध नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्य शासनाचा काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला असून त्यांच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष,व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत मध्ये कार्यरत असणार्या नगरपरिषद आस्थापनेवरील व राज्यस्तरीय संवर्ग कर्मचारी यांचे विविध प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत त्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत मध्ये कार्यरत असणार्या नगरपरिषद आस्थापनेवरील व राज्यस्तरीय संवर्ग कर्मचारी यांचे विविध प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.त्यात प्रामुख्याने कर्मचाऱ्यांचे वेतन व सहायक अनुदानाची पद्धत बंद करून थेट कोषागारातून करावे अशी मागणी कर्मचारी संघटनेची असून सर्व कर्मचार्यांना सेवार्थ प्रणाली लागू करा,जुनी पेन्शन योजना लागू करणे,कर्मचार्यांचे विनाअट समावेशन करणे,आश्वासित प्रगती योजना लागू करणे,पदोन्नती,मुख्याधिकारी पदभार पात्र अधिकारी यांना मुख्याधिकार्यांच्या रजा कालावधीत देणे,सेवाविषयक लाभ वेळेवर देणे,आकृतीबंध सुधारित करणे,वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करणे,कोवीड मुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारस यांना ५० लक्ष मदत मिळवून देणे,सफाई कामगारांना घरे बांधून देणे आदि मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता एकूण तीन टप्प्यात राज्यातील सर्व नगरपरिषदा,नगरपंचायती मध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.त्यातील पहिला टप्पा म्हणून आज दि.०१ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून काम करून शासनाचा निषेध करण्यात आला आहे.
या मागण्यांबाबत आज कोपरगांव नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,अभियंता दिगंबर वाघ,लेखापाल तुषार नालकर,लेखा परीक्षक भीमराव संसारे,नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे आदी मान्यवर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.आज दिवसभर कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून काम केले.
आपल्या मागण्या वेळीच मान्य न झाल्यास अथवा प्रलंबीत राहिल्यास पुढील टप्प्यातील आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे असे कर्मचारी संघटनेच्या प्रतींनिधींनी संगितले.