कामगार जगत
श्रमिकांच्या कष्टाची आपल्याला जाणीव-मंगेश पाटील
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रमिकांच्या कष्टाची आपल्याला जाणीव असून या संघटित कामगारांच्या अडचणीसाठी आपण त्यांना मदत करण्यास तयार असून त्यांच्या न्यायहक्काच्या संघर्षाच्यावेळी साथ देऊ असे आश्वासन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी दिले आहे.
श्रमिकराज कामगार संघटनेच्या माध्यमातून इमारत बांधकाम कामगारांसाठी सभासद नोंदणी अभियान चालू करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार असून तो गौरवास्पद असून यामध्ये कष्टकरी व असंघटित कामगारांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे-मंगेश पाटील,माजी नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समरणार्थ संविधान दिनाचे औचित्य साधून श्रमिकराज कामगार संघटनेच्या वतीने इमारत बांधकाम कामगार नोंदणी अभियान फलकाचे अनावरण माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वकर्मा समाजाचे प्रदेशाध्यक्ष संजय सूर्यवंशी होते.
या वेळी माजी जि.प.सदस्य दीपक गायकवाड,श्रमिक कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष अजय विघे,उपाध्यक्ष राजेंद्र पगारे,रंभाजी रणशुर,सचिव गणेश पवार,कोषाध्यक्ष कुणाल झाल्टे, संघटक विलास गवळी,माजी नगरसेवक अरविंद विघे,अड्.नितीन पोळ,पालिकेचे नगरसेवक मेहमुद सय्यद,शंकर घोडेराव,राहुल धिवर,सुनीता पवार,सविता साळवे,सविता वाघ बुद्धिष्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन,राजेंद्र उशिरे,मनोज शिंदे,कैलास साळवे,नितीन शिंदे, प्रबुद्ध भातणकर,अभिजित वाघ मिलिंद विघे,अनिरुद्ध विघे,कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीचे अकबर भाई शेख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष पाटील म्हणाले की,”आपण अभियंता असून इमारत बांधकाम कामगारांचे कष्ट बघितले आहे.त्यामुळे शासनाकडून यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न श्रमिकराज कामगार संघटनेच्यावतीने करण्यात येणार असून यामध्ये कामगार वर्गाने मोठ्या प्रमाणात आपले नाव नोंदवावे.ज्यावेळी संघटनेला काही अडचण आल्यास त्यावेळी आपण संघटने बरोबर खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन मंगेश पाटील यांनी शेवटी दिले आहे.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले आहे.त्यावेळी त्यांच्या हस्ते श्रमीकराज संघटनेच्या फलकाचे उदघाटन करण्यात आले आहे.
मंगेश पाटील यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत गेल्या दहा वर्षापासून जे कोपरगावातील अतिक्रमण उठलेले असून त्यामध्ये काही लोकांनी कोपरगाव सोडून निघून गेले तर काहीचा प्रपंच उघड्यावर पडला काहींनी आत्महत्या केल्या असे असताना दि.४ सप्टेंबर रोजी श्रमिकराज कामगार संघटनेच्या वतीने आपण कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यांनी विस्थापित धारकांना लवकरात लवकर खोका शॉप बांधून देण्याचे मान्य केले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय भातनकर यांनी केले.व उपस्थितांचे आभार राजेंद्र पगारे यांनी मानले आहेत.