गुन्हे विषयक
“खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी आंदोलन,दोघांवर ऍट्रॉसिटी दाखल,कोपरगावातील घटना
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या आदिवासी इसमाने गावातील आरोपी विरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अडकविण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास खोटा गुन्हा दाखल केला असून तो मागे घेण्यासाठी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यासमोर आज सकाळ पासून दुपारी ३ वाजे पर्यंत एकलव्य संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले असून,”खोटा गुन्हा मागे घेत नाही तो पर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही” अशी भूमिका मंगेश औताडे यांचेसह आंदोलकांनी घेतली आहे.त्यामुळे पोलीस नेमकी काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
“कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी आम्हास,”सदर गुन्हा चौकशी करून मागे घेण्याबाबत आश्वासित केले असून “जर आगामी काळात सदर गुन्हा मागे घेतला नाही तर आम्ही शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू”-मंगेश औताडे,अध्यक्ष,एकलव्य आदिवासी परिषद,महाराष्ट्र राज्य.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील वेळापुर येथील आदिवासी तरुण गणेश वसंत वाघ (वय-२५)
मंगळवार दि.११ एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वाजता आनंद जगधने व मनोज बाबळे यांचे शेताचे सामायिक बांधावर आपल्या प्रातःविधिसाठी गेला होता.तो आपला विधी झाल्यानंतर घरी परत येत असताना यातील आरोपी आनंद जगधने व त्यांचा मुलगा (पूर्ण नाव माहिती नाही) हे घटनास्थळी आले व त्यांनी त्यास हरकत घेतली,”तू,आमचे शेतात संडासला का गेला होता ? तू,” तुझी संडास हाताने उचलून खा” असे म्हणून तू तुला काय (फिर्यादीच्या जातीचा उल्लेख करून) गोळा करायचे ते कर” असे म्हणून धक्काबुक्की करून शिवीगाळ करून दमदाटी करून हातातील लाकडी बांबूने मारहाण केली असल्याचा आरोप फिर्यादी तरुणाने केला आहे व या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या फिर्यादीवर दबाव आणण्यासाठी आरोपींनी फिर्यादिस सदर गुन्हा मागे घेण्यासाठी मोठी यातायात केली असून रात्री उशिरापर्यंत त्यास यश आले नाही हे पाहता शेवटचा पर्याय म्हणून काही माध्यस्थांचा वापर करून प्रयत्न अयशस्वी झाल्याचे पाहून अखेरचे अस्त्र काढले असून एका महिलेच्या नावाने फिर्यादिवर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.त्या गुन्ह्यास पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे.त्या विरोधात,’एकलव्य आदिवासी परिषद’ या संघटनेने आज सकाळी अकरा वाजे पासून पोलीस ठाण्याच्या समोर,’धरणे आंदोलन’ करून सदर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.मात्र आमच्या प्रतिनिधीने घटनस्थळी भेट दिली असता त्यास दुपारी २.३० वाजे पर्यंत त्यांना यश आले नव्हते.दुपारी ०३ वाजेच्या सुमारास अखेर आंदोलन माघार होत नाही हे पाहून पोलीस निरीक्षक देसले आपल्या सहकाऱ्यांसंवेत तालुका पोलीस ठाण्यात आले होते.त्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक दालनात निवडक कार्यकर्त्यांना बोलावून त्यांची समजूत घातली आहे असल्याची बातमी हाती आली आहे.मात्र सदर गुन्हा मागे न घेताच कार्यकर्त्यानी आपले बिऱ्हाड गुंडाळले असल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर प्रसंगी किरण गांगुर्डे,विजय त्रिभुवन आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह जवळपास १००-१२५ कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान याबाबत मंगेश औताडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी आम्हास,”सदर गुन्हा चौकशी करून मागे घेण्याबाबत आश्वासित केले असून “जर आगामी काळात सदर गुन्हा मागे घेतला नाही तर आम्ही शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू” असा लेखी इशारा दिला असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान या ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत सुरेगाव येथील घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक आर.एल.जगताप आदींनी भेट दिली आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या दप्तरी नोंद केली क्रं.१८९/२०२३ भा.द.वि.कायदा कलम-३२४,३२३,५०४,५०६,३४ अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध सुधारणा कायदा कलम सन-२०१५ चे कलम ३(१)(आर) ३(१)(एस)३(२) (व्ही-ए) अन्वये रात्री उशिरा नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.