जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

न्यूजसेवा

अ.नगर- (प्रतिनिधी)

सामाजिक न्याय पर्व अंतर्गत अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीच्या श्रीरामपूर व राहूरी तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राविषयी साध्या व सोप्या भाषेत सुलभ मार्गदर्शन करण्यात आले.या मार्गदर्शनाचा अनेक विद्याथी व पालकांनी लाभ घेतला असल्याची माहिती हाती आली आहे.

“जिल्ह्यातील महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र मिळविण्याच्या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात यावे.त्यानूसार महसुल विभाग यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येईल”-भा.उ.खरे,सचिव,जात प्रमाणपत्र पडताळणी समिती.

पुण्याचे समाज कल्याण आयुक्त व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणेचे महासंचालक यांनी दिलेल्या निर्देशानूसार या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.श्रीरामपूर येथील सेवा नर्सिंग कॉलेज विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची कार्यपध्दती तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळवतांना येणाऱ्या अडीअडचणी यासंदर्भात समितीचे सदस्य सचिव भा.उ.खरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य अजमोद्दीन शेख,समतादूत एजाज पिरजादे यांनी समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.सुत्रसंचालन भार्गव बेल्हेकर व कुमारी वैष्णवी बर्वे यांनी केले. कार्यक्रमास १२० पेक्षा जास्त विद्यार्थी,विद्यार्थीनी,शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

राहूरी येथील सावित्री बाई फुले हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज इयत्ता ८ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांचेकडून मिळवतांना कोणकोणती कागदपत्रे सादर करावी याबाबत समितीचे सदस्य सचिव श्री.खरे यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाने यांनी सर्व विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र मिळविण्याच्या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात यावे.त्यानूसार महसुल विभाग यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येईल असेही श्री.खरे यांनी शेवटी सांगितले आहे.यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीमती धनवटे,बार्टी समतादुत एजाज पिरजादे,उपमुख्याध्यापक तुपविहीरे उपस्थित होते.या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close