कृषी विभाग
कोपरगावात अवकाळीने मोठें नुकसान,भरपाई द्या-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात रविवार दि.०९ एप्रिल रोजी रांजणगाव देशमुख व परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांना दिल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यात अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आ.काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांच्याशी संपर्क करून त्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या सूचनेनुसार सोमवार (दि.१०) रोजी सकाळपासून प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार ०९ एप्रिल पर्यंत पावसाचा अदाज वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे राज्यात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी व गारपीट झाली होती. मात्र कोपरगाव तालुका या नैर्सगिक संकटातून बचावला असे वाटत असतांना रविवार (०९) रोजी सायंकाळी कोपरगाव तालुक्याला फटका बसलाच.तालुक्यातील रांजणगाव देशमुख व परिसरात सायंकाळी ४ वाजता अचानक पावसाचे वातावर तयार होवून मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे काढणीला आलेल्या कांदा,गहू पिकांचे तसेच फळ बागांचे व चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
झालेल्या नुकसानीचे वृत्त समजताच आ.काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांच्याशी संपर्क करून त्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या सूचनेनुसार सोमवार (दि.१०) रोजी सकाळपासून प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनीं त्यांचे आभार मानले आहे.