जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

प्राध्यापकाचा खून,कोपरगावात नऊ जणांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या शारदानगर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक स्व.भीमराव लक्ष्मण काळे यांचा सुभाष वैद्य,सरला वैद्य,किरण वैद्य,दीपाली वैद्य,एकनाथ चव्हाण,संदीप चव्हाण,गंगुबाई चव्हाण,पाटील,सोनवणे (दोघांचे पूर्ण नाव माहिती नाही) आदीं नऊ जण आले व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून आपल्या सेवानिवृत्त प्राध्यापक पतीचा खून केल्या प्रकरणी मयताची पत्नी हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कोपरगाव येथील अतिरिक्त न्या.महेश शेलार यांचे मार्फत गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान सदर वाद सुरु असताना मयताने आपल्या भ्रमणध्वनीत सदरचे चलचित्रण केले होते त्या दरम्यान खाली कोसळले असल्याची नागरिकांत मोठी चर्चा सुरु आहे.त्याबाबत शारदानगर परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला व त्यांचे पती भीमराव काळे हे संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेत प्राध्यापक होते ते त्यावेळी गत वर्षी मे महिन्याच्या दरम्यान आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले होते.ते कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण दिड कि.मी.अंतरावर असलेल्या शारदानगर येथील रहिवासी होते.त्यांच्या शेजारी छोटे दत्त मंदिर असून त्या ठिकाणी पथदिवा फिरविण्याच्या कारणावरून त्यांचे शेजारी व त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.त्यावरून दि.०८ मे २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास आरोपी सुभाष वैद्य,सरला वैद्य,किरण वैद्य,दीपाली वैद्य,एकनाथ चव्हाण,संदीप चव्हाण,गंगुबाई चव्हाण,पाटील,सोनवणे (दोघांचे पूर्ण नाव माहिती नाही) आदीं नऊ जणांचा महावितरण कंपनीचा पोल वरील विद्युत दिवा वायरमनच्या सहाय्याने फिरवून लावण्याच्या किरकोळ कारणावरून वरून वाद निर्माण झाला होता.त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले होते.हि घटना दि.८ मे रोजी दुपारी घडली होती.त्याबाबत कोपरगाव शहर पोलिसांत त्याच दिवशी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

त्यात आरोपीनीं आपल्या पतीस लाथा बुक्क्यांनी मारहाण करून मारले असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.व त्यात आपल्या पतीचे निधन झाले होते असा मुख्य आरोप आहे.त्यावरून त्यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी महेश शिलार यांचे कडे न्याय मागीतला होता.

त्याबाबत फिर्यादी महिला व आरोपीचे वकील यांनी सदर महिलेचा वकिलामार्फत युक्तिवाद ऐकूण न्यायालयाने या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

दरम्यान त्या आदेशानुसार कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.१२३/२०२३ भा.द.वि.कलम ३०२,३९५,५०४,५०६,५०९,१२०(ब) ३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close