जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दंडाधिकाऱ्यांचा अकाली शिमगा,महिला कर्मचाऱ्यांसह दोघींशी आक्षेपार्ह वर्तन ? कोपरगावातील घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तहसील कार्यालयाचे दंडाधिकारी विजय बोरुडे यांनी आपल्या लहरी वर्तनाने कहर केला असून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे ०५ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत अचानक प्रवेश करून तेथील दरवाजा जोरजोराने ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक तरुणीशी असभ्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने कोपरगाव शहरासह तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तालुका दंडाधिकारी या सारख्या जबाबदार घटकाने मद्य प्राशन करून भल्या पहाटे जर तालुक्यातील विविध संस्थात्मक कार्यालये आणि त्यात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आदींशी वागताना दुरवर्तन केले तर काय होईल ? या कृतीचा अनेकांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.मात्र अशी घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात घडली असून ती दस्तूर खुद्द तहसीलदार विजय बोरुडे यांचेकडून हा प्रपात घडला असल्याचे वास्तव उघड झाले आहे.त्यामुळे तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”तालुक्याचे तहसीलदार हे कायद्याची पदवी न घेताही तो अर्ध न्यायिक जबाबदाऱ्या तहसीलदार पार पाडत असतो.त्यात समन्स पाठवणे,प्रसंगी अटक वॉरण्ट काढणे,दंड करणे असे अधिकार येतात.नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी आदींना मार्गदर्शन करणे,वेळोवेळी आपल्या तालुका कार्यक्षेत्राच्या कार्याचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करणे आणि तालुक्यात नैसर्गिक संकट आल्यास त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे त्वरित सादर करणे,तालुक्यातील विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना पोहचवणे आदी कामे तहसीलदारास करावी लागतात.त्यामुळे तहसीलदार यांचा तालुक्यात मोठा प्रशासकीय दबदबा असतो.त्यामुळे या घटकाकडे तालुक्यातील नागरिक मोठ्या आशेने पाहत असतात.मात्र याच घटकाने मद्य प्राशन करून भल्या पहाटे जर तालुक्यातील विविध संस्थात्मक कार्यालये आणि त्यात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आदींशी वागताना दुरवर्तन केले तर काय होईल ? अनेक जण टणकण उडल्याशिवाय राहणार नाही.या कृतीचा अनेकांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.मात्र अशी घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात घडली असून ती दस्तूर खुद्द तहसीलदार विजय बोरुडे यांचेकडून हा प्रपात घडला असल्याचे वास्तव उघड झाले आहे.त्यामुळे तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.या घटनेचा शहरात मोठा बोलबाला झाल्याने माध्यम प्रतिनिधींचा ग्रामीण रुग्णालयात मोठा गराडा पडला होता.

तहसीलदार विजय बोरुडे यांची दिलगिरी

“आपण तालुक्यात रोज पहाटे रस्ता भेटी,वाव-विवाद भेटी नियमित करत असतो.त्या अनुषंगाने दि.२५ फेब्रुवारी रोजी शहर व तालुका पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असल्याच्या घटनेस दुजोरा दिला असून सदर भेट हि रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी व कर्मचारी उपस्थित राहण्यासाठी दिली असून यात कोणास काही चुकीचे वाटले किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करत आहे”-विजय बोरुडे,तहसीलदार,कोपरगाव.

सकाळी त्यांनी ५.०५ मिनिटांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आपल्या पिवळ्या दिव्याच्या गाडीसह प्रवेश मिळवला (मात्र उद्देश स्वच्छ असेल तर त्यांनी गाडी थेट प्रवेशद्वारात लावायला हरकत नव्हती मात्र तसे झाले नाही) त्यांनी आपली सरकारी गाडी अंधारात संरक्षण भिंतीच्या आत लावली होती.त्या नंतर ग्रामीण रुग्णालयाचे प्रवेशद्वार जोरजोराने वाजविण्यास प्रारंभ केला होता.त्यावेळी तेथील कर्मचारी यांनी तो दरवाजा उघडला असता थेट तहसीलदार समोर ‘दत्त’ म्हूणून हजर असल्याने त्याची बोलती बंद झाली.त्यांनी लागलीच येथे कर्तव्यावर असलेल्या परीचारिकेस याबाबत कल्पना दिली असता त्यांनी त्या परीचारिकेस फैलावर घेत,”येथे कामावर कोण डॉक्टर आहेत” अशी विचारणा केली त्यांनी,”कोणी नाही” म्हटल्यावर त्यांनी तेथील हजेरी रजिस्टरची मागणी केली सदर परिचारिकेने ते डॉक्टर यांचेकडे असते.”डॉक्टर नाही,तेथे हजेरी रजिस्टर नाही” म्हटल्यावर त्यांचा रागाचा पारा सातव्या आसमंतात गेला.त्यांनी सदर परीचारिकेस डॉक्टरला फोन लावण्यास सांगितले व त्यांचा भ्रमणध्वनी लागला असता त्यांना अर्वाच्च शिवीगाळ करून,” मला हजेरी नोंद पुस्तिका दाखवा” असे दरडावले.त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करून पाहिला असता ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.त्यांनी डॉ.सचिन यादव यांना खूप अर्वाच्च शिवीगाळ केली असल्याचा चर्चा तेथे प्रत्यक्षदर्शीकडून ऐकवायवास मिळाली आहे.व त्यांना तुम्ही कर्तव्यावर का नाही ? असा जाबसाल करून त्यांना,”लगेच तुम्ही कामावर हजर व्हा “असे आदेश सोडले असल्याची माहिती मिळाली आहे.त्यानंतर त्यांनी तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परीचारिकेस मागील बाजूस घेऊन त्यांच्याशी आक्षेपार्ह कृती केली आहे.तर त्याच ठिकाणी उपचारास आलेल्या एका महिला रुग्णाच्या तरुण मुलीशी त्यांनी तीच कृती केली असल्याचा दावा सदर महिलेने केला आहे.

या दरम्यान त्यांचा चालक हा प्रारंभी सदर कृतीचे आपल्या भ्रमणध्वनीत चित्रीकरण करत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून या घटनेनंतर त्यांनी काढता पाय घेतला असून त्या आधी पहाटे ३.३० वाजता त्यांनी आपला मोर्चा शहर व तालुका पोलीस ठाण्यात वळवला होता तर त्या आधी त्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या बस आगारातही हा अतिरिक्त उद्योग केल्याची माहिती समजते.त्या ठिकाणीही त्यांनी तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलीस आणि परिवहन कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले असल्याचे कळते.मात्र त्यांना हा गंभीर मामला लगेच लक्षात आल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना कळवून त्याकडे कानाडोळा केला असल्याचे वृत्त आहे.मात्र सदर मामला हा तेथील सतत सुरु असलेल्या चलचित्रणात कैद झाल्याचे बोलले जात आहे.मात्र तालुका दंडाधिकारी यांना पोलीस ठाण्यात जाऊन त्यांची पडताळणी करण्याचा सनदशीर अधिकार आहे का असा सवाल निर्माण झाला आहे.

दरम्यान कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील हा ‘राडा’ तेथील अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ लोकप्रतिनिधी,वरिष्ठ महुसल अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला असल्याचे समजते.त्यामुळे आता या प्रकरणावर राज्याचे महसूल मंत्री,जिल्ह्यातील वरिष्ठ महसुली अधिकारी काय कारवाई करणार ? असा सवाल निर्माण झाला आहे.दरम्यान प्राप्त माहितीनुसार आरोग्य अधिकारी हे आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर होत असून त्या नंतर पुढील कार्यवाही होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close