जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आरोपी अटक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर त्याच हद्दीतील एका तरुणाने शारीरिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी मुस्तफा जब्बार खाटीक (वय-३४) रा.धामोरी यास बेड्या ठोकल्या असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका महिलेला एक मुलगी असून ती गुरुवार दि.२३फेब्रुवारी रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास किराणा दुकानात काडेपेटी आणण्यास जात असताना आरोपी मुस्तफा खाटीक याने तिला फूस लावून आपल्या दुचाकीवर बसवून नेऊन तिला धामोरी येथील इंग्लिश स्कुल परिसरात नेऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला असल्याची माहिती हाती आली आहे.

सदर महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे.मात्र एका तरुणाचे तिच्यावर वाईट नजर होती.त्यातून गुरुवार दि.२३ फेब्रुवारी रोजी हि घटना घडल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी खबर मिळताच घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दौलतराव जाधव व त्यांचे सहकारी घटनास्थळी धाव घेऊन त्या बाबत पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.१००/२०२३ भा.द.वि.कलम ३६३,३७६,५०६ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम -२०१२चे कलम ४,६,८,१२ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नि.सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

कोपरगाव तालुक्यात या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून या आरोपीवर तालुका पोलिसांनी सदर आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close