जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात दुचाकीस्वारांचा सुळसुळाट सुरु

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले फिर्यादी राजू कचरू पठाण यांची हिरो होंडा एच.एफ.डिलक्स हि सुमारे ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोरून चोरून नेली असल्याने त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा उच्छाद मोठ्या प्रमाणावर सुरु असून अनेकांच्या दुचाकीवर चोरट्यांची वक्रदृष्टी आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथे घडली आहे.तेथील कामगार राजू पठाण यांनी दि.२० ऑगष्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वरील वर्णनाची हिरो होंडा कंपनीची एच.एफ.डिलक्स (क्रं.एम.एच.१७ सी.एच.३५३३) दुचाकी आपल्या घरासमोर उभी करून ठेवली होती.सकाळी ते आपले नियत कर्म करण्यासाठी उठले असताना त्यांच्या घरासमोर आपली दुचाकी उभी दिसली नाही.त्यांनी अन्य ठिकाणी तिचा शोध घेऊन पाहिला असता ती मिळून आली नाही.त्यामुळे अखेर त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

दरम्यान या बाबत त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञातच चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक जाधव यांचेसह पो.हे.कॉ. एस.डी.बोटे यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३३१/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बोटे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close