जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

कोपरगावातील…या विदयालयात विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राजश्री शाहु महाराज जेष्ठ नागरीक मंच, कोपरगावच्या वतीने शालेय गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले असल्याची माहिती मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोरोना कालावधी नंतर शाळा सुरु झाल्या परंतु त्यांमध्ये बरेच कुटुंब आर्थिक संकटात सापडले व त्यामुळे या संकटात काही प्रमाणात गरजु विदयार्थीना मदत व्हावी म्हणुन विविध सामाजिक संस्थाच्या मदतीने विदयालयातुन शालेय गणवेष,दप्तर तसेच वहीवाटपाचे नियोजन करण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणुन आज शालेय वह्या वाटप करण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त या उपक्रमात राजर्षी शाहू महाराज जेष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष मन्साराम पाटील,उपाध्यक्ष गणपतराव विधाटे,सचिव विजय राहतेकर यांचे सह सर्व सदस्य उपस्थित होते.अध्यक्ष मन्साराम पाटील यांनी विदयालयाला पुढील काळात अजुन भरीव मदत करु असे जाहीर करुन मात्र मुलांनी अभ्यासात कमी पडु नये असे आवाहन केले आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले तर स्वागत कला शिक्षक ए.बी.अमृतकर यांनी केले आहे तर सुत्रसंचलन पी.बी.जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close