जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…या तालुक्यात 2.50 लाख रुपयांची चोरी,गुन्हा दाखल!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील चोरट्यांच्या विविध लीला सुरूच असून कासली शिवारात पंतप्रधान सौर कुसुम योजनेच्या कामाच्या सुमारे 2.50 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक सामान प्लांटची 33 के.व्हि.ए.ॲल्युमिनिअम पॅन्थर कंन्डटर तीन कि.मी.केबलअज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याने याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात खाजगी विद्युत अभियंता चिराग अशोक तिवारी (वय -24 ) यांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी अभियंता हे दि.03 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दहेगाव बोलका येथील सबस्टेशनला गेले होते व रात्री ड्युटीवर मोतीराम रामदास इंगळे,गोपीनाथ अंकुश गोधाडे आदी कर्मचारी होते.त्यानंतर दि.05ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजेचे सुमारास फिर्यादी चिराग तिवारी व कॉन्ट्रक्टर शुभम निकम असे साईडवर गेले असता तेथे त्यांनी पसरुन ठेवलेली पॅन्थर कंन्डटर केबल त्यांना दिसलीच नाही.त्याबाबत त्यांनी सिक्युरिटी गार्ड व आजुबाजुला चौकशी केली असता पॅन्थर कंन्डटर केबल कोणीतरी कापुन घेवुन गेलेले आढळून आले होते.

   पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित सौर पंप दिले जातात.२०१९ मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना केवळ सौरऊर्जेपुरती मर्यादित नाही तर शेतकऱ्यांना ऊर्जा ग्राहकांपासून ऊर्जा उत्पादक बनवून भारतीय शेतीची अर्थव्यवस्था बदलण्याचा हा एक प्रयत्न आहे.शेतीमधील डिझेल पंपाच्या तुलनेत सौर पंप बसवणे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असून इंजिनमुळे होणारे हवा प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होत आहे.शिवाय महावितरण कंपनीवरील भर कमी होत असल्याने त्याकडे शेतकऱ्यांचे ओढा वाढला आहे.त्यामुळे अनेक शेतकरी या योजनांकडे वळले आहे.परिणामी यात अनेक कंपन्या सहभागी होऊन शेतकऱ्यांना सेवा देत आहेत.यातील फिर्यादी अभियंता चिराग तिवारी हे शुभम निकम यांचेकडे काम करत आहेत.त्यांचे रांजणगाव देशमुख,कासली,दहीगाव बोलका आदी तीन ठिकाणी कामे सुरू आहेत.संबंधित इसम हे दि.03 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दहेगाव बोलका येथील सबस्टेशनला गेले होते व रात्री ड्युटीवर मोतीराम रामदास इंगळे,गोपीनाथ अंकुश गोधाडे आदी कर्मचारी होते.त्यानंतर दि.05ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजेचे सुमारास फिर्यादी चिराग तिवारी व कॉन्ट्रक्टर शुभम निकम असे साईडवर गेले असता तेथे त्यांनी पसरुन ठेवलेली पॅन्थर कंन्डटर केबल त्यांना दिसलीच नाही.त्याबाबत त्यांनी सिक्युरिटी गार्ड व आजुबाजुला चौकशी केली असता पॅन्थर कंन्डटर केबल कोणीतरी कापुन घेवुन गेलेले आढळून आले होते.त्यानंतर पॅन्थर कंन्डटर केबलचा आजुबाजुस परिसरात शोध घेतला परंतु आमच्या प्लाटच्या पॅन्थर कंन्डटर केबल मिळुन आल्या नाही त्यानंतर त्यांनी त्यांच्या 2.50 लाख रुपयांच्या किंमती केबल कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असल्याची खात्री झाल्याने त्यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

  दरम्यान याबाबत कोपरगाव तालुका पोलीसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.450/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 302(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल निजामुद्दीन शेख हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close