जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

वाळूचोरांचा हैदोस,वनाधिकाऱ्यांना मारहाण,चाळीस जणांवर गुन्हा ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर वन विभागाचे नगर येथील पथकाने कारवाई करत सदर वाहने ताब्यात घेतली असता 35-40 वाळूचोऱ्यानी त्यावेवर लोखंडी रॉड,कोयते,लाठ्या काठ्या आदींच्या सहाय्याने गंभीर हल्ला करून वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पळण्यास भाग पडले असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.याबाबत या सर्व आरोपींवर कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अहिल्यानगर येथील वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब ठकाजी वाघुलकर (वय-45 वर्षे ) यांनी गुन्हा दाखल केला आहे.या घटनेतून वाळूचोरांची शिरजोरी समोर आली असून त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नवीन पोलिस अधिकाऱ्यांवर आली असल्याचे समजले जात आहे.

संकल्पित छायाचित्रे.

दरम्यान काही वाळूचोरांनी वाळूविरोधी तक्रारी करत असल्याचा संशय धरून मागील काळात गोदावरी पर्यावरणपूरक सामाजिक कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे माहिती उपलब्ध झाली असून त्यांना विनाकारण अडकवले असल्याचे माहिती हाती आली आहे.त्यात काही वरिष्ठ अधिकारी सामील असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय मागितला असून आता ते काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

   कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपशाच्या घटना वेळोवेळी समोर येत असून,महसूल प्रशासन आणि पोलीस यावर सातत्याने कारवाई करत आहेत.ऑक्टोबर २०२६ मध्ये मायगाव देवी परिसरात सुरू असलेला अवैध वाळू उपसा महसूल प्रशासनाने उघडकीस आणला.या कारवाईत जेसीबी आणि डंपरसह सुमारे २०.३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.जुलै २०२६ मध्ये सुरेगाव परिसरात अवैध वाळू उपशाविरोधात महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली होती.सप्टेंबर २०२६ मध्येही कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपशाप्रकरणी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.यापूर्वी मंजूर साठ्यापेक्षा जास्त वाळूउपसा केली प्रकरणी ठेकेदारावर जवळपास चार कोटी रुपयांची जप्ती केली होती.या पार्श्वभूमीवर राजकीय अभय मिळाल्याने हा अवैध वाळू उपसा कोणत्या थराला गेला असून त्यांची दहशत नुकतीच समोर आली आहे.आजपर्यंत या वाळूने अनेक तहसीलदार,तलाठी,पोलिस अधिकारी,पोलिस कर्मचारी आदींना घरी जाण्यास भाग पाडले असल्याचे दिसून आले आहे.तरीही वाळूला सोन्याचे मोल आल्याने वाळूचोर थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.अशीच घटना काल दि.08 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 11.30 वाजता घडली आहे.यातील कारवाई करण्यासाठी अहिल्यानगर वन विभागाला काही नागरिकांनी ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या.त्यातून वन विभागाने आपले अधिकारी आणि कर्मचारी आदींना कारवाईसाठी पाठवले होते.ते नगर येथून दोन वाहने घेऊन घटनास्थळी म्हणजेच कोळगाव थडी या ठिकाणी आले होते.त्यांनी गोदावरी नदी पात्रातुन राखीव वनक्षेत्रात अवैध रित्या प्रवेश करुन वाळुची साठवणूक करून चोरटी वाहतुक करणा-या स्वराज कंपनीच्या मालकीच्या ट्रॅक्टरला काल मध्यरात्री 11.30 ते 01 वाजेच्या सुमारास पकडले होते.वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करत असलेल्या त्यांचे कायदेशीर कामात अडथळा आणण्यासाठी व चोरटी वाळू वाहक करणारी वाहने पकडली म्हणून त्याचा राग मनात धरून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी आरोपी दिपक चंद्रभान मोरे,आकाश नंदकिशोर निंबाळकर,नंदकिशोर लक्ष्मण निंबाळकर,देवराम वाल्मीक कोळपे,निलेश नंदकिशोर निंबाळकर,वसिम मोहम्मद शेख,कृष्णा जनार्दन काळे,कृष्णा जनार्दन काळे सर्व रा.कोळगाव थडी,प्रतीक मोहन कोळपे,जालीदर पांढरे,राहुल रविंद्र निकाळे,संदीप साहेबराव निकाळे,किरण साहेबराव निकाळे,रा.कोळपेवाडी,अर्जुन गुरळे रा.मुर्शतपुर,आनंद उर्फ बंटी साळवे रा.सुरेगाव व इतर 35 ते 40 अनोळखी इसमांनी हातात लोखंडी रॉड,लाकडी काठ्या,लोखंडी कोयते घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांचा रस्ता अडवुन फिर्यादी व साक्षीदार बसलेल्या शासकीय वाहनावर ( क्रमांक एम.एच.१६ डी.झेड.४५७८) हल्ला करून त्याची तोडफोड केली असून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे.यात स्वराज कंपनीचा एक वाळूसह ट्रॅक्टर या पथकाने जप्त केला आहे.मात्र फिर्यादीत मात्र या वन अधिकाऱ्यांनी हा उल्लेख टाळला असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे  पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचेसह सहाय्यक पोलिस निरीक्षक सुंदर्डे यांनी बेट दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

अहिल्यानगर वन विभागाची तोडफोड केलेली गाडी छायाचित्रात दिसत आहे.

कोळगाव थडी शिवारात गोदावरीत चोरटी वाळू वाहक करणारी वाहने पकडली म्हणून त्याचा राग मनात धरून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी आरोपी दिपक चंद्रभान मोरे,आकाश नंदकिशोर निंबाळकर,नंदकिशोर लक्ष्मण निंबाळकर,देवराम वाल्मीक कोळपे,निलेश नंदकिशोर निंबाळकर,वसिम मोहम्मद शेख,कृष्णा जनार्दन काळे,कृष्णा जनार्दन काळे सर्व रा.कोळगाव थडी,प्रतीक मोहन कोळपे,जालीदर पांढरे,राहुल रविंद्र निकाळे,संदीप साहेबराव निकाळे,किरण साहेबराव निकाळे,रा.कोळपेवाडी,अर्जुन गुरळे रा.मुर्शतपुर,आनंद उर्फ बंटी साळवे रा.सुरेगाव व इतर 35 ते 40 अनोळखी इसमांनी हातात लोखंडी रॉड,लाकडी काठ्या,लोखंडी कोयते घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांचा रस्ता अडवुन फिर्यादी व साक्षीदार बसलेल्या शासकीय वाहनावर हल्ला करून त्याची तोडफोड केली असून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना उघडकीस आली आहे.

    दरम्यान याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.-450/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 132,121,126(2)189(2),190,191,324(4),351(2),352,303(2) सार्वजनिक मालमता नुकसान प्रतिबंधक भारतीय वन अधिनियम 26(डी)(जी),(एच/कलम 41,42(2),52,महाराष्ट्र गौण खनिज प्रतिबंधक कायदा कायदा 1957 चे कलम 21 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरर्डें हे करीत आहेत.

दरम्यान या राड्यात मध्यरात्री या वाळूचोरांनी पळून जाण्यासाठी नजिकच्या शेतकऱ्याची या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

   दरम्यान काही वाळूचोरांनी वाळूविरोधी तक्रारी करत असल्याचा संशय धरून मागील काळात गोदावरी पर्यावरणपूरक सामाजिक कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे माहिती उपलब्ध झाली असून त्यांना विनाकारण अडकवले असल्याचे माहिती हाती आली आहे.त्यात काही वरिष्ठ अधिकारी सामील असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय मागितला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.वाळूचोरीतील गुंता दिवसेंदिवस वाढत चाललाअसल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close