जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात अविवाहित तरुणीने घेतला गळफास !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील बोलकी येथील अविवाहित तरुणी कु.रोहिणी अरुण गायकवाड (वय-१८)हिने आपल्या घरात कोणी नाही हि संधी साधत घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असल्याची हृदयद्रावक घटना उघड झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान या तरुणीच्या आत्महत्येबाबत तिने कुठलीही आत्महत्या प्रकरणी चिट्ठी-चपाटी लिहून ठेवलेली नाही हे विशेष ! त्या बाबत कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.मात्र तिने आत्महत्या का केली याचे कोडे कोपरगाव तालुका पोलीस प्रशासनास पडले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्याच्या इशान्नेस साधारण पंधरा कि.मी.अंतरावर बोलकी ग्रामपंचायत हद्दीत मयत तरुणीचे कुटुंब राहते.त्या कुटुंबात तिच्यासह आई,वडील,एक लहान भाऊ असा परिवार आहे.एका मोठ्या बहिणीचे लग्न झालेले आहे.

दि.०१ मार्च रोजी दुपारी ०१.५५ वाजेच्या सुमारास घरातील आई वैजापूर येथे गेली होती तर वडील गावात काही कामासाठी गेलेले होते आणि लहान भाऊ उसाचे वाढे आणण्यासाठी गेलेला असताना तिने घरात कोणी नाही ही संधी साधत घरातील छताला साडीची दोरी करत त्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
दरम्यान हि बाब प्रथम घरच्या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने तिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकांऱ्यानी तिला मृत घोषित केले आहे.

दरम्यान या घटनेबाबत तिने कुठलीही आत्महत्या प्रकरणी चिट्ठी-चपाटी लिहून ठेवलेली नाही हे विशेष !त्या बाबत कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.मात्र तिने आत्महत्या का केली याचे कोडे कोपरगाव तालुका पोलीस प्रशासनास पडले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद दप्तर.क्रं.१५/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंदणी केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.व्ही.गवसणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close