जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात अज्ञात इसमाचा मृत देह,ग्रामस्थांत खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या काळा माथा या ठिकाणी सरकारच्या वनजमिनीत नुकताच एका अज्ञात इसमाचा मृत देह आढल्याने तालुक्यात व संवत्सर शिवारात खळबळ उडाली आहे.

दरम्यान संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत “काळा माथा” या ठिकाणी नजीक लोकवस्ती नसल्याने अशा घटना वारंवार घडत असून ग्रामस्थांत व या रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी आपली गस्त वाढविणे गरजेचे बनले आहे.त्या ठिकाणीच असलेल्या नदीवर नव्याने बांधलेला मोठा पूल असून या पुलाच्या आधारे त्या ठिकाणी रात्री चोरटे लपून बसतात अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या पश्चिमेस साधारण दोन कि.मी.अंतरावर असलेल्या सरकारी वन जमिनीत “काळा माथा”या ठिकाणी एका ३५-४० वय असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला आहे.तो सडपातळ असून डोक्याचे केस काळे,दाढी वाढलेली असून त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा फुल बाहीचा शर्ट,काळ्या रंगाची मळकट फुल जीन्स पॅन्ट असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दऱम्यान या प्रकरणी कोपरगाव येथील परिमंडळ वन अधिकारी भाऊसाहेब संपत गाढे (वय-५६) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.त्यामुळे हा खून की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.२३/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपासपोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या अँर्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close