जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात सोयाबीन चोरी,चोर बारा तासात पकडला,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव बाजार समितीच्या आवारात काल सकाळी ९ वाजता एक छोटा हत्ती या रिक्षातून एका चोरट्याने बारा गोण्यात भरलेले ३० हजार रुपये किमतीचे बारा गोण्या सोयाबीन भरून परागंदा झालेला भामट्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांत बाजार समितीचे सचिव नानासाहेब सोपान रणशूर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी धारणगाव येथील आरोपी ज्ञानेश्वर दादा सोनवणे अवघ्या बारा तासात जेरबंद केला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले असून पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोयाबीन चोरीकरून पळून गेलेली रिक्षा हि धारणगाव येथील संशयित आरोपी ज्ञानेश्वर सोनवणे याची असल्याचे लक्षात आले.त्यांनी आरोपीचा शोध घेतला असता तो धारणगाव येथे शोधून जेरबंद केला आहे.दरम्यान या चोरट्याविरुद्ध अधिकचे गुन्हे सिद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्या दिशेने पोलीस तपास सुरु आहे.मात्र मुद्देमाल अद्याप जप्त करण्यात आलेला नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव बाजार समिती हि तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखली जाते.या ठिकाणी शेतकरी आपला शेतीमाल घेऊन विक्रीसाठी येत असतात.सदर ठिकाणी बाजार समितीने चोरी व चोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चलचित्रण सुविधा निर्माण केल्या आहेत.व जागोजागी त्यासाठी माहिती फलक लावून जनजागृती केली आहे.त्यामुळे या ठिकाणी चोरी-मारीचे प्रकार सहसा होत नाही.मात्र यावर एका चोरट्याने नुकतीच मात केलेली असल्याचे दिसून आले आहे.दि.२ डिसेंबर रात्री १० ते ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान कोपरगाव बाजार समिती येथील सकाळच्या वेळी सदर चोरट्याने फाटकावरील पहारेकरी बाजार समितीतील दिवे बंद करण्याचे काम करत आहे.व प्रवेशद्वाराच्या फाटकाजवळ कोणी नाही हि संधी साधून त्याने बाजार समितीत प्रवेश मिळवला व कोणाचे लक्ष नाही हि बाब हेरून तेथील सोयाबीन व्यापारी संतोष ज्ञानदेव सांगळे यांच्या ३० हजार रुपये किमतीच्या सोयाबीनच्या बारा गोण्या आपल्या गाडीत टाकल्या व कोणाचे लक्ष नाही अशी संधी साधून बाहेर पळून गेला होता.

दरम्यान हि बाब तेथील व्यापारी संतोष सांगळे हे आपल्या शेडमध्ये आल्यावर लक्षात आली व त्यांनी तेथील आपला सोयाबीनचा माल गायब असल्याचे लक्षात आले.असता त्यांनी बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांचे लक्षात आणून दिले.

दरम्यान या घटनेने सचिव रणशूर यांनी आपले चलचित्रण तपासले असता त्यात संशयित आरोपी चोरी करताना आढळून आला असता त्यांनी सदरचे चलचित्रण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले पोलीस हेड कॉन्स्टेबल डी.आर.तिकोणे यांनी भेट दिली आहे.

व त्या अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली असता सदरची रिक्षा हि धारणगाव येथील संशयित आरोपी ज्ञानेश्वर सोनवणे याची असल्याचे लक्षात आले.त्यांनी आरोपीचा शोध घेतला असता तो धारणगाव येथे शोधून जेरबंद केला आहे.दरम्यान या चोरट्याविरुद्ध अधिकचे गुन्हे सिद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्या दिशेने पोलीस तपास सुरु आहे.मात्र मुद्देमाल अद्याप जप्त करण्यात आलेला नाही.

दरम्यान पोलिसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३५६/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close