कोपरगाव तालुका
कोपरगावात ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या टिळकनगर येथे ‘संविधान चौक’ मंडळाच्या वतीने नुकताच भारतीय संविधान दिन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं होतं.दरवर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो.आपला भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला.पण देशाची राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमंलात आली.म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.कोपरगावात तो नुकताच उत्साहात संपन्न झाला आहे.
देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं होतं.दरवर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो.आपला भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला.पण देशाची राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमंलात आली.म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.या दिवशी प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता.२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असं मानलं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारलं.त्यामुळे देशभर हा दिन साजरा करण्यात येतो.कोपरगाव येथील टिळकनगर येथेही तो उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक मंदार पहाडे,माजी नगरसेवक संजय कांबळे,नानासाहेब जगताप,अमोल शिंदे,संजय दुशिंग,साहेबराव शिंदे,विशाल कोपरे,संजय कोपरे,लक्ष्मण शिंदे,राजेंद्र उशिरे,रवींद्र जाधव,सुनील जाधव,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक नानासाहेब मोरे यांनी केले तर सूत्रसंचलन नितीन शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय कांबळे यांनी मानले आहे.