गुन्हे विषयक
सरकारी कामात अडथळा,कोपरगावात एकावर गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या आरोपी इसम निखिल सुखदेव भाटे याने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन तेथे उपस्थित असलेल्या महिला ग्रामसेवक सुवर्णा बबन वडीतके (वय-३५) यांना उद्देशून,”माझे घरकुलाबाबत जो निर्णय झाला तो मला मान्य नाही”असे म्हणून जोरजोरात ओरडून अंगावर धावून येऊन टेबलावर हाताने जोर जोराने मारून दहशत निर्माण केली व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
नागरिकांनी आपले सरकारी काम विधायक पद्धतीने अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यावर सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचे कडून करून घ्यावे असे लोकशाही व्यवस्थेत अपेक्षित असताना बऱ्याच ठीकाणी गैरसमजातून नागरिक आक्रस्ताळेपणा करून सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचे अंगावर धावून जातात.त्यामुळे त्या कार्यालयात ताणतणाव वाढून तंटेबखेडे निर्माण होताना दिसून येतात अशीच घटना खिर्डी गणेश हद्दीत घडली आहे.
सदरचे सविस्तर्व वृत्त असे की,नागरिकांनी आपले सरकारी काम विधायक पद्धतीने अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यावर सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचे कडून करून घ्यावे असे लोकशाही व्यवस्थेत अपेक्षित असताना बऱ्याच ठीकाणी गैरसमजातून नागरिक आक्रस्ताळेपणा करून सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचे अंगावर धावून जातात.बऱ्याच वेळा या ठिकाणी राजकीय मतभेद असताना व त्यात तेथील राजकारणी कामापेक्षा आपल्या राजकीय लाभासाठी या अडाणी नागरिकांचा वापर करताना दिसून येतात.तर काही ठिकाणी अधिकारी वा कर्मचारी हे आर्थिक लाभासाठी नाहक नागरिकांना चकरा मारण्यास भाग पाडतात.त्यामुळे त्या कार्यालयात ताणतणाव वाढून तंटेबखेडे निर्माण होताना दिसून येतात.अशाच प्रकारची घटना खिर्डी गणेश या ग्रामपंचायत हद्दीत घडली असून आरोपी निखिल भाटे याने दि.०४ ऑगष्ट रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तेथे हजर असलेल्या ग्रामसेविका वडीतके यांना जोरजोराने ओरडून “माझे घरकुलाबाबत जो निर्णय झाला तो मला मान्य नाही”असे म्हणून जोरजोरात ओरडून अंगावर धावून येऊन टेबलावर हाताने जोर जोराने मारून दहशत निर्माण केली व सरकारी कामात अडथळा आणला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी ग्रामसेविका सुवर्णा वडीतके यांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं. २९१/२०२१ भा.द.वि.कलम ३५३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.