जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

हात उसने पैसे मागितले,विटाने मारहाण,कोपरगावात दोघांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या महिलेने आपल्या नातेवाईकास हात उसने दिलेले पैसे मागितले याचा राग येऊन आरोपी अभिजित सोनाजी जाधव व त्याची पत्नी रोहिनी अभिजित जाधव यांनी फिर्यादी महिला संगीता बाळासाहेब गायकवाड (वय-४२) यांना शिवीगाळ,दमदाटी करून खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण करून फिर्यादी यांचे डोक्यात विटाने मारहाण केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

काही कारणाने आर्थिक अडचण आल्याने फिर्यादी महिलेकडे आरोपी भाचा अभिजित जाधव याने हात उसने पैसे मागितले होते.वास्तविक हि रक्कम त्याने परत आपली गरज संपली असता परत करणे गरजेचे होते.मात्र फिर्यादी माहिले वारंवार आपले उसनवारी पैसे मागितले असता ते आरोपी याने दिले नाही.व रक्कम मागीतल्याचा राग येऊन हि मारहाणीची घटना घारीत घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,घारी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी फिर्यादी महिला संगीता गायकवाड व आरोपी अभिजित गायकवाड हा फिर्यादी महिलेचा भाचा आहे.व रोहिणी गायकवाड हि त्याची पत्नी आहे.काही कारणाने आर्थिक अडचण आल्याने फिर्यादी महिलेकडे आरोपी भाचा अभिजित जाधव याने हात उसने पैसे मागितले होते.वास्तविक हि रक्कम त्याने परत आपली गरज संपली असता परत करणे गरजेचे होते.मात्र फिर्यादी माहिले वारंवार आपले उसनवारी पैसे मागितले असता ते आरोपी याने दिले नाही.व रक्कम मागीतल्याचा राग येऊन त्याने दि.०१ ऑगष्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आरोपीच्या घरी जाऊन रक्कम मागीतल्याचा राग येऊन अभिजित जाधव व त्याची पत्नी रोहिणी जाधव यांनी फिर्यादी महिलेस शिवीगाळ दमदाटी करून खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण करून विटाने डोक्यात वार करुन फिर्यादी महिलेस जखमी केले आहे.या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलीसांनी आपल्या दप्तरी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.२९२/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तापास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही.एन.कानकाटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close