जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात व्यापाऱ्यांची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील राजस्थानी महालक्ष्मी ट्रेंडर्सचे मालक शंकरलाल जोधमल चौधरी (वय-२५) रा.कोळपेवाडी यांनी आपल्या गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सुरेगावात आपल्या व्यवसायानिमित्त राजस्थानातून आलेले व मितभाषी असणारे शंकरलाल चौधरी यांचा स्वभाव ग्राहकांना आकर्षित करणारा असल्याने आपल्या धंद्यात त्यांनी चांगला जम बसवला होता.टाळेबंदी काळात दुकानात असणारे सर्व कामगार राजस्थान येथे आपल्या गावी गेले असता ही दुर्दवी घटना घडली आहे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील महालक्ष्मी ट्रेंड्सचे मालक शंकरलाल जोधमल चौधरी या मालकांची सोमवारी दि.१० मे रोजी सायंकाळी पत्र्याच्या शेड मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सावळीविहिर-भरवस राज्य मार्ग सात लगत सुरेगाव येथे माहेगाव पेट्रोल पंपा शेजारी सुमारे दहा वर्षापासून महालक्ष्मी बिल्डिंग मटेरीयलचे दुकान राजस्थान येथून आलेले शंकर चौधरी यांनी स्थापन केले होते.सोमवारी सायंकाळी सहा वाजता शंकर यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. मितभाषी असणारे शंकर चौधरी यांचा स्वभाव ग्राहकांना आकर्षित करणारा असल्याने आपल्या धंद्यात त्यांनी चांगला जम बसवला होता.टाळेबंदी काळात दुकानात असणारे सर्व कामगार राजस्थान येथे आपल्या गावी गेले असता ही दुर्दवी घटना घडली आहे.मृत देह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.याबाबत नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.

दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद क्रं.१५/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एल.भताने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close