गुन्हे विषयक
सामायिक बांधावरील माती ओढल्याने हाणामारी,कोपरगावात तिघांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारात, “सामायिक बांधावरील अँगल रोवलेले असल्याने त्यावरील माती ओढू नका”असे म्हटल्याचा राग येऊन आरोपी शिवाजी रंगनाथ सोनवणे, राहुल शिवाजी सोनवणे, निवृत्ती रंगनाथ सोनवणे, सर्व रा.ब्राम्हणगाव आदींनी आपल्याला शिवीगाळ करून लाकडी दांडा व फावड्याने व लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी केले असल्याची फिर्याद आप्पासाहेब गंगाधर मोरे (वय-२५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
फिर्यादी व आरोपींचा ब्राम्हणगावात दोघांच्या क्षेत्राचा सामायिक शेतबांध आहे.त्यावर त्यांनी लोखंडी अँगल रोवलेले आहे.त्या अँगल जवळ दि.१० मे रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास आरोपी शिवाजी रंगनाथ सोनवणे,राहुल शिवाजी सोनवणे,निवृत्ती रंगनाथ सोनवणे हे सामायिक बांधावरील वादग्रस्त जागेवरील माती ओढत होते.त्याला फिर्यादी आप्पासाहेब मोरे यांनी हरकत घेतली होती.त्याचा वरील तीन आरोपींना राग आला त्यावरून हे महाभारत घडले आहे.
सदरसे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी आप्पासाहेब मोरे व आरोपी शिवाजी सोनवणे व अन्य आदी सर्व कोपरगाव तालुक्यातील रहिवाशी आहेत.त्याचे शेतजमीन जवळजवळ आहे.त्यांचा या क्षेत्राचा सामायिक शेतबांध आहे.त्यावर त्यांनी लोखंडी अँगल रोवलेले आहे.त्या अँगल जवळ दि.१० मे रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास आरोपी शिवाजी रंगनाथ सोनवणे,राहुल शिवाजी सोनवणे,निवृत्ती रंगनाथ सोनवणे हे सामायिक बांधावरील वादग्रस्त जागेवरील माती ओढत होते.त्याला फिर्यादी आप्पासाहेब मोरे यांनी हरकत घेतली होती.त्याचा वरील तीन आरोपींना राग आला व त्यांनी फिर्यादी मोरे यांना आरोपी शिवाजी सोनवणे याने हातातील फावड्याने फिर्यादीच्या दोन्ही पायावर मारहाण केली व डाव्या पायाच्या नडघीवर मारून ती तोडून टाकली आहे.तसेच दुसरा आरोपी राहुल सोनवणे याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने फिर्यादिस मारहाण केली आहे.या शिवाय तिसरा आरोपी निवृत्ती सोनवणे याने त्यास लाथा बुक्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आरोपींविरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१५२/२०२१ भा.द.वि कलम ३२६,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.आंधळे हे करीत आहेत.