निधन वार्ता
श्री काशी विश्वनाथ ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांचे निर्वाण

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगावसह उत्तर महाराष्ट्रातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे जवळचे शिष्य व कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या समाधी स्थळी असललेल्या श्री काशी विश्वनाथ ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प.मोहनराव चव्हाण (वय-८२) नुकतेच अल्पशा आजाराने आज दुपारी ०४ वाजता नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे निधन झाले आहे.त्याच्या पच्छात एक भाऊ,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.उद्योजक सुनील चव्हाण व संदीप चव्हाण यांचे ते पिताश्री होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राष्ट्र संत श्री जनार्दन स्वामी यांची प्रथम ओळख दर्शनाचे निमित्ताने हि पुणतांबा येथे १९७१ साली पुणतांबा यात्रेत झाली होती.त्या नंतर त्यांनी हा संपर्क तब्बल चार वर्ष ठेवला होता.व त्या आधी त्यांनी स्वामी विवेकानंद व त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे जीवन चरित्र अभ्यासले होते.त्यानंतर त्यांच्यात गुरु करण्याची उर्मी निर्माण झाली होती.त्यातून त्यांची व जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानले होते.व १९७५ ला शिष्यत्व पत्करले होते.ते नाते त्यांनी अखेरपयंत टिकवले.
राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी यांची प्रथम ओळख दर्शनाचे निमित्ताने हि पुणतांबा येथे १९७१ साली पुणतांबा यात्रेत झाली होती.त्या नंतर त्यांनी हा संपर्क तब्बल चार वर्ष ठेवला होता.व त्या आधी त्यांनी स्वामी विवेकानंद व त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे जीवन चरित्र अभ्यासले होते.त्यानंतर त्यांच्यात गुरु करण्याची उर्मी निर्माण झाली होती.त्यातून त्यांची व जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानले होते.व १९७५ ला शिष्यत्व पत्करले होते.
स्व.मोहनराव चव्हाण हे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे जवळचे शिष्य मानले जात होते.राष्ट्र संत जनार्दन स्वामी यांच्या महानिर्वाणाचे अगोदर काही त्यांनी त्यांचे आपल्या मृत्युपत्रात नोंदवलेल्या विश्वस्थात त्यांचे अध्यक्ष म्हणून उल्लेख केलेला होता.त्यामुळे ते राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे जेंव्हा १९८९ साली महानिर्वाण झाले त्या अगोदर नोंदवलेल्या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून गणले गेले होते.मात्र त्या नंतर जनार्दन स्वामी यांचे दुसरे शिष्य श्री शांतिगिरीजी महाराज यांनी या गादीवर दावा सांगितला त्या नंतर त्यांचा वाद उच्च न्यायालयात अनेक वर्ष सुरु होता.मात्र ते १९७८ नंतर आपल्या आजतागायत अध्यक्ष होते.
त्यांना दि.गुरुवार ०७ ऑक्टोबर रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार्थ दाखल केले होते.मात्र त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली व आज दुपारी ०४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.त्या वेळी त्यांच्या सोबत त्यांचे जेष्ठ चिरंजीव सुनील चव्हाण व संदीप उर्फ बाळासाहेब चव्हाण व बंधू लक्ष्मणराव चव्हाण हे स्वतः हजर होते.त्यांच्या पत्नीचे गत पाच वर्षांपूर्वी तर अन्य दोन बंधूंचे निधन त्यांच्या आधीच झाल्याने ते खचले होते.तरी त्यांनी आपल्या हयातीत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांची सेवा अखण्डपणे केली होती.
त्यांची व संत जनार्दन स्वामी यांची प्रथम ओळख दर्शनाचे निमित्ताने हि पुणतांबा येथे १९७१ साली पुणतांबा यात्रेत झाली होती.त्या नंतर त्यांनी हा संपर्क तब्बल चार वर्ष ठेवला होता.व त्या आधी त्यांनी स्वामी विवेकानंद व त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे जीवन चरित्र अभ्यासले होते.त्यानंतर त्यांच्यात गुरु करण्याची उर्मी निर्माण झाली होती.त्यातून त्यांची व जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानले होते.व १९७५ ला शिष्यत्व पत्करले होते.
त्यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील जेऊर-कुंभारी येथे दि.३१ ऑगष्ट १९३९ रोजी झाला होता.त्याचे प्राथमिक शिक्षण जेऊर कुंभारी तर माध्यमिक शिक्षण कोपरगाव येथील संस्थेत झाले होते.तर वाणिज्य शाखेची(बी.कॉम.) पदवी त्यांनी नाशिक येथील महाविद्यालयांत घेतली होती.त्या नंतर त्यांनी संजीवनी सहकारी कारखान्यात सन-१९६१ साली स्थापन होतानाच नोकरी सुरु केली होती.पुढे त्यांनी तत्कालीन कारखान्याचे संस्थापक व कोपरगाव तालुका पंचायत समितीचे सभापती असलेले व नंतर राज्याचे मंत्री झालेले नेते शंकरराव कोल्हे यांचा विश्वासू सहकारी म्हणूंन जो विश्वास संपादन केला तो अखेर पर्यंत टिकवला होता.त्यातूनच त्यांनी तब्बल २५ वर्ष कारखान्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती.व बढती होत होत ते थेट महाव्यवस्थापक पदा पर्यंत पोहचले होते.
सन १९७५ साली ते सहकार या विषयी इस्रायलच्या अभ्यास दौऱ्यावर गेले होते.पाच महिने त्यांनी येथील अभ्यास पूर्ण केला होता.त्या नंतर तब्बल वीस देशांचे भ्रमण करून मायदेशी परतले होते.सन-२००० साली ते सेवानिवृत्त झाले होते.त्या नंतर त्यांनीं सहकारी कारखान्याची यंत्रणा बनविण्याचा कारखाना ‘व्हिजन इंडस्ट्रीज’ हा आपल्या गावीच उभारला होता.तर आपल्या अनुभवाच्या जोरावर काही सहकारी कारखाने चालविले होते.तरीही त्यांची अखेरपर्यंतची खरी ओळख ही राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे निस्सीम भक्त हीच होती.त्यांनी शिक्षण क्षेत्रातही पाऊल ठेवले होते.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महर्षी केंद्रीय माध्यमिक विद्यालय प्रथम कोपरगाव तालुक्यात सुरु करण्याचा मान त्यांनी १९९८ साली पटकावला होता.त्यात भर घालून कनिष्ठ महाविद्यालय सुरु केले होते.त्यांनी श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी काठी असलेले व देशभर प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र सराला बेट येथील गादीचे व श्री क्षेत्र कोपरगाव बेट यांचे जवळचे नाते निर्माण केले होते.त्याचे श्रेय निर्विवाद त्यांनाच द्यावे लागेल.त्यांनी आपल्या हयातीत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांची पुण्यतिथी व शिवरात्र महोत्सवांना मोठे स्वरूप प्राप्त करून दिले होते.त्यासाठी ते दर पुण्यतिथीच्या आधी सप्ताहभर आधी नित्यनियमाने पत्रकारांची भेट घेऊन आपल्या ट्रस्टच्या विविध व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देऊन त्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करत त्यात गत दोन वर्षांपासून कोरोना साथीने खंड पडला होता.
त्यांच्यावर कोपरगाव तालुक्यातील जेऊर-कुंभारी येथील त्यांच्या जन्मगावी गोदावरी तीरावर उद्या सोमवार दि.०१ नोव्हेम्बर रोजी सकाळी १० वाजता अंत्यविधी संपन्न होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.त्यांच्या निधनाने उत्तर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.