कृषी विभाग
…या कंपनीचा चीनच्या कंपनी बरोबर करार !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील अश्वमेध ग्रुप आणि चीन येथील शेंडोंग लुटियन ऑटोमेशन इक्विपमेंट कंपनी लिमिटेड यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एम.ओ.यू.) झाला आहे.यात”सेंद्रिय खत उत्पादनात यांत्रिकीकरण व मायक्रोबियल तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करून आशियामधील इनपुट उत्पादकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जलद कंपोस्टिंग तंत्रज्ञान विकसित करणे यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती अश्वमेध चे संचालक डॉ.ज्ञानेश्र्वर वाघचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.कंपनीच्या या कराराचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

“लुटीयन कंपनी ही चीन मधील प्रसिद्ध कंपनी आहे तिने आधीच ६५ देशांमध्ये आपले जाळे निर्माण केले आहे,ती आता आश्वमेध ग्रुपच्या नाविन्यपूर्ण मायक्रोबियल तंत्रज्ञानासोबत काम करणार आहे.त्यात ते शेतकऱ्यांना दर्जेदार व जलद उत्पादन साधने उपलब्ध करून देणार आहे”-डॉ.ज्ञानेश्र्वर वाघचौरे,संचालक,अश्वमेध ऍग्रोटेक कंपनी,कोपरगाव.
कोपरगाव येथे ‘अश्वमेध’ नावाची कंपनी प्रसिद्ध किटकतज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी स्थापन केली आहे.त्यांची ही कंपनी देशभर कार्यरत आहेच पण आता त्यांची कीर्ती जगात जाऊन पोहचली आहे.ही ‘अश्वमेध अॅग्रोकेमिकल्स’ कंपनी शेती आणि खत-औषध उत्पादनांशी संबंधित आहे.तसेच,त्यांचे’अश्वमेध’ नावाचे एक आयुर्वेदिक औषध उत्पादनाचे केंद्र देखील आहे,जे स्वस्त आणि आयुर्वेद आणि त्यांच्या औषधी गोळ्यांचे उत्पादन करते.आता त्यांनी आपला मोर्चा आशियातील सर्वात मोठ्या असलेल्या चीन या देशात वळवला आहे.त्यांनी चीन येथील शेंडोंग लुटियन ऑटोमेशन इक्विपमेंट कंपनी लिमिटेड यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार नुकताच केला आहे.सदर करार सी.ए.सी.शांघाय-२०२५ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात झाला आहे त्यात अश्वमेध ग्रुपचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे आणि लुटियन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारतातील सेंद्रिय खत उत्पादनात यांत्रिकीकरणाच्या गरजा आणि संधी यावर चर्चा केली आहे.

दरम्यान लुटियन कंपनी ही जी कंपनी आहे तिने आधीच ६५ देशांमध्ये आपले जाळे निर्माण केले आहे,ती आता आश्वमेध ग्रुपच्या नाविन्यपूर्ण मायक्रोबियल तंत्रज्ञानासोबत काम करणार आहे.त्यात ते शेतकऱ्यांना दर्जेदार व जलद उत्पादन साधने उपलब्ध करून देणार आहे.या महत्त्वपूर्ण भागीदारीसाठी श्री. झांग बो आणि त्यांच्या अधिकाऱ्याचे त्यानी स्वागत केले आहे.दरम्यान अम्मा असोसिएशनचे सचिव डॉ.प्रशांत धरनकर यांनी लुटियन कंपनीचे कौतुक केले आणि या ऐतिहासिक क्षणाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.या सामंजस्य कराराच्या कार्यक्रमात आश्वमेध ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.