जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

रवींद्र बागरेचा यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )


   कोपरगाव येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि भाजपचे माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे खंदे समर्थक रवींद्र बागरेचा (वय-६०वर्षे) यांचे काल रात्री ८.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,दोन भाऊ,पत्नी,तीन मुले,सूना नातवंडे आदी मोठा परिवार आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे गोदावरी तीरावर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

  

स्व.रवींद्र बागरेचा यांनी सन-१९९३ साली किल्लारी तसेच गुजरातमध्ये भुजमध्ये आलेल्या भूकंपात मदतीसाठी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे सोबत मोठे काम केले होते.तसेच राम जन्मभुमी आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता.स्वातंत्रवीर सावरकर यांची जयंती,विवेकानंद जयंती आदी सह विविध उपक्रमात सातत्याने सहभाग नोंदवला होता.

     स्व.रवींद्र बागरेचा यांनी राजा शिवछत्रपती संघटनेसह त्यांनी भाजप मध्ये दीर्घकाळ काम केले होते.सन-१९९३ साली किल्लारी तसेच गुजरातमध्ये भुजमध्ये आलेल्या भूकंपात मदतीसाठी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे सोबत मोठे काम केले होते.तसेच राम जन्मभुमी आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता.स्वातंत्रवीर सावरकर यांची जयंती,विवेकानंद जयंती आदी सह विविध उपक्रमात सातत्याने सहभाग नोंदवला होता.सन-२०१६ साली कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रस्थापित काळे-कोल्हे या बलाढ्य नेत्यां विरुध्द भाजपचे नेते विजय वहाडणे यांनी अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी मोठी भूमिका निभावली होती.त्यामुळे अनेकांच्या स्मरणात राहतील.

   त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करणेत आले आहे.त्यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,प्रभाकर वाणी,भाजप चे मीडिया सेल चे प्रांतिक अध्यक्ष समीर आंबोरे,माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,ऍड.मच्छिंद्र खिलारी,राजेंद्र खिलारी,योगेश वाणी,नामदेवराव जाधव आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close