जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

जोडप्याची दिवसा ढवळ्या रस्ता लूट,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिर्डी-नाशिक राज्य महामार्गावर दि.३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास देर्डे-कोऱ्हाळे ग्रांमपंचायत हद्दीत देर्डे फाट्यानजीक आपल्या दुचाकीवरून आपल्या घरी चांदगव्हाण येथे जात असताना अज्ञात तीन चोरट्यांनी दुसऱ्या दुचाकीवरून पाठलाग करून आपल्याला अडवून दमदाटी देऊन पत्नीची पर्स व त्यातील रोख रक्कम ३५ हजार व ३ तोळे वजनाचे ७५ हजार रुपये किमतीचे मनीं मंगळसूत्र असा ०१ लाख १० हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला असल्याची फिर्याद माधव शंकर आव्हाड (वय-३८) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील देर्डे फाटा येथे शिर्डी-नाशिक राज्यमार्गावरून आपल्या घरी जात असताना त्याच्या पाळतीवर असलेले तीन अज्ञात चोरटे यांनी त्यांचा पाठलाग केला.व हॉटेल जय जनार्दन जवळ कोळपेवाडी रोडवर त्यांनीं गाडी अडवून दमदाटी देऊन मागील सीटवर बसलेल्या पत्नीच्या हातात असलेली पर्स घेऊन पोबारा केला आहे.त्यातील एकाने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मनिमंगळसूत्र तोडून घेतले व पर्स हिसकावून घेतली व पोबारा केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी माधव आव्हाड व त्यांची पत्नी रेखा आव्हाड हे कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण येथील रहिवासी असून त्यांना एक मुलगा,एक मुलगी,आई लताबाई आव्हाड,वडील शंकर आव्हाड असे कुटुंबातील सदस्य आहे व ते एकत्र राहतात.त्याचे किराणा दुकान असून दिवाळीचा सण आल्याने त्यांनी आपल्या दुकानात किराणा भरण्यासाठी काही रकमेची गरज होती त्यासाठी त्यांनी शनिवार दि.३० ऑक्टोबर रोजी सिन्नर तालुक्यातील चासनळवाडी येथील सासुरवाडी गाठली होती.तेथून त्यांनी आपल्या मेहुणे गणेश रामनाथ दराडे यांचेकडून रुपये ३५ हजारांची रक्कम उसनवारी घेऊन ते सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास परत आपल्या घरी येत असताना ते कोपरगाव तालुक्यातील देर्डे फाटा येथे शिर्डी-नाशिक राज्यमार्गावरून आपल्या घरी जात असताना त्याच्या पाळतीवर असलेले तीन अज्ञात चोरटे यांनी त्यांचा पाठलाग केला.व हॉटेल जय जनार्दन जवळ कोळपेवाडी रोडवर त्यांनीं गाडी अडवून दमदाटी देऊन मागील सीटवर बसलेल्या पत्नीच्या हातात असलेली पर्स घेऊन पोबारा केला आहे.

त्यातील एकाने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मनिमंगळसूत्र तोडून घेतले व पर्स हिसकावून घेतली. दरम्यान मानिमंगळसूत्रातील काही मणी खाली गाळून पडले होते.आम्ही आरडाओरडा केला असता त्यांनी घटनास्थळवरून पोबारा केला आहे.त्या आरोपींचे वय साधारण २५ ते ३० वर्ष होते.त्यातील दोघे आरोपी हा सडपातळ तर एक जाडसर होता.जाडसर असललेल्या आरोपीने दाढी मिशा राखलेल्या होत्या.त्याने आपल्या पत्नीच्या हातातील पर्स हिसकावुन घेतली आहे.त्यांच्या अंगात जीन्स पॅन्ट व पांढरा सदरा होता.या बाबत घटनेनंतर फिर्यादी व त्यांची पत्नी घाबरून गेले होते.त्यांनी दुसऱ्या दिवशी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गाठले व याबाबत रीतसर गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने तालुका पोलिसांपुढे या चोरट्यांनीं आव्हान निर्माण केले आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३७६/२०२१ भा.द.वि.कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close