गुन्हे विषयक
कोपरगाव नगरपरिषदेत अधिकाऱ्यास अरेरावी-काम बंदचा इशारा !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषेतील नगरसेवक विजय गोविंदराव वाजे यांनी आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास विद्युत विभागातील एका विभागप्रमुख हुद्द्यावरील एका अधिकाऱ्यास अरेरावी केल्याने हा वाद नगरपरिषद कर्मचारी संघटनेने गंभीरपणे घेतला असून या प्रकरणी नगरपरिषेतील नगरसेवकांची अरेरावी थांबविण्यासाठी नगरपरिषदेचे काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
नगरसेवक वाजे हे विद्युत विभागात आले व त्यांनी त्या विभागातील प्रमुखास म्हणाले की,”तु टेबलवरून उठ “व “तुझी जागा बदलली तर तुला काही प्रॉब्लेम आहे का ? व तू, मुख्याधिकाऱ्यांनी विचार नाही तर मुख्यमंत्री यांना विचार टेबल तेथेच राहील” असे म्हणून अवमानास्पद वागणूक दिली आहे.त्यावर हे महाशय थांबले नाही तर “माझेवर कलम ३५३ सारखे गुन्हे दाखल आहेत,मी मुंबईच्या अधिकाऱ्यांना मारले आहे”अशा शब्दात धमकावले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेत नगराध्यक्ष विजय वहाडणे व भाजप (माजी आ.कोल्हे गट) यांचा विकास कामांच्या ठराव मंजूर करण्यावरून गत बारा जानेवारी पासून वाद सुरु झालेला असताना व त्यावर अद्याप तोडगा निघालेला नसताना आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे.कोपरगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक विजय वाजे यांचा नवीन वाद समोर आला आहे.त्यात नगरपरिषदेच्या कर्मचारी संघटनेने आज नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास नगरसेवक वाजे हे विद्युत विभागात आले व त्यांनी त्या विभागातील प्रमुखास म्हणाले की,”तु टेबलवरून उठ “व “तुझी जागा बदलली तर तुला काही प्रॉब्लेम आहे का ? व तू, मुख्याधिकाऱ्यांनी विचार नाही तर मुख्यमंत्री यांना विचार टेबल तेथेच राहील” असे म्हणून अवमानास्पद वागणूक दिली आहे.त्यावर हे महाशय थांबले नाही तर “माझेवर कलम ३५३ सारखे गुन्हे दाखल आहेत,मी मुंबईच्या अधिकाऱ्यांना मारले आहे”अशा शब्दात धमकावले आहे.त्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपमान झाला आहे.शहर विकासात महत्वपूर्ण योगदान देण्याऱ्या कर्मचाऱ्यांचा वारंवार होणारा अपमान हि गंभीर बाब असून प्रत्येक वेळी काही नगरसेवकांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला आहे.काही नगरसेवकांचे पती अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार दमबाज्या करत अपमान करत असतात.त्यामुळे नगरपरिषदेत भीतीचे वातावरण पसरले आहे.प्रत्येक काम करून घेताना दमदाटिचा पायंडा पडला असून हि बाब नक्कीच गंभीर आहे.या सातत्त्याने होणाऱ्या दमदाटीला अधिकारी व कर्मचारी वैतागले आहे.अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा अपमान कुठपर्यंत सहन करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे या नगरसेवकांवर जो पर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत आपण आज सायंकाळ पासून काम बंद आंदोलन करणार असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.नगरपरिषदेची कामे प्रलंबित राहिल्यास त्याला हे बेशिस्त नगरसेवकच जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे.
निवेदनावर उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,ज्ञानेश्वर चाकने,दीपक बडगुजर,योगेश खैरे,नितेश मिरीकर,मनोज लोट,एकनाथ डाके,संभाजी कार्ले,भालचंद्र उंबरजे,तुषार नालकर,ऋतुजा पाटील,श्वेता शिंदे,पल्लवी सूर्यवंशी,रणधीर तांबे,गणी पठाण,पवन हाडा,रवींद्र दिनकर,योगेश कोपरे,सुनील आरणे,अरुण फजगे,एम.बी.दुसंगे आदींच्या सह्या आहेत.