जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सार्वजनिक बांधकामाचे प्रस्ताव तयार करा-अधिकाऱ्यांना सूचना

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सुरु असलेली विकासकामे तातडीने मार्गी लावून प्रलंबित असलेल्या विकासकामांचे प्रस्ताव तातडीने तयार करावे सदर प्रस्तावांचा पाठपुरावा करावा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी जागतिक बँक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकत्याच दिल्या आहे.

शहरातील टपरीधारक व्यावसायिकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहरात ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या-त्या ठिकाणी अद्यावत व्यापारी संकुल निर्मितीसाठी प्रस्ताव तयार करावा.भाजी मार्केटमधील गाळे व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा देखील प्रस्ताव तयार करावा व कोपरगाव शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी-आ.काळे

कोपरगाव शहरातील प्रलंबित विकास कामांच्या प्रश्नांबाबत आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची कोपरगाव येथे बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,बांधकाम अभियंता दिगंबर वाघ,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,हिरामण गंगूले,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,मेहमूद सय्यद,रमेश गवळी,फकीर कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,बांधकाम अभियंता दिगंबर वाघ,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,हिरामण गंगूले,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,मेहमूद सय्यद,रमेश गवळी,फकीर कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.


या बैठकीत आ. आशुतोष काळे यांनी प्रलंबित विकासकामांचा आढावा घेतांना विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.शहरातील टपरीधारक व्यावसायिकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहरात ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या-त्या ठिकाणी अद्यावत व्यापारी संकुल निर्मितीसाठी प्रस्ताव तयार करावा.भाजी मार्केटमधील गाळे व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा देखील प्रस्ताव तयार करावा व कोपरगाव शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. व शारदानगर परिसरात पावसाचे पाणी येवून निर्माण होत असलेल्या अडचणींवर कायमचा तोडगा काढावा असे आदेश आ. आशुतोष काळे यांनी जागतिक बँक अधिकारी व सार्वजनिक कर्मचाऱ्यांना शेवाटी दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close