जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पालिकेतील “त्या” आंदोलनाबाबत..हा निर्णय झाला

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषेतील नगरसेवक विजय गोविंदराव वाजे यांनी काल दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास विद्युत विभागातील एका विभागप्रमुख हुद्द्यावरील एका अधिकाऱ्यास अरेरावी केल्याने नगरपरिषद कर्मचारी संघटनेने नगरपरिषेतील नगरसेवकांची अरेरावी थांबविण्यासाठी नगरपरिषदेचे काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता मात्र उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व गटनेते रवींद्र पाठक यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने आज साडे अकरा वाजेच्या सुमारास दिलगिरी व्यक्त केल्याने काल सायंकाळ पासून सुरू केलेले काम बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जाहीर केल्याने या वादावर पडदा पडला आहे.

आज सकाळ पासून पालिकेसमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने आज सकाळी पासून पाण्याची अत्यावश्यक सेवा वगळून हे आंदोलन सुरू झाल्याने कोल्हे गटाचे धाबे दणाणले होते.आज सकाळी दहा वाजेपासून नगरपरिषद कर्मचारी पालिका कार्यालयाच्या समोर एकत्र जमले होते व ,”जो पर्यंत नगरसेवक विजय वाजे माफी मागत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही” असे ठणकावले होते.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेत नगराध्यक्ष विजय वहाडणे व भाजप (माजी आ.कोल्हे गट) यांचा विकास कामांच्या ठराव मंजूर करण्यावरून गत बारा जानेवारी पासून वाद सुरु झालेला असताना व त्यावर अद्याप तोडगा निघालेला नसताना काल दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास आणखी एका वादाची ठिणगी पडली होती.कोपरगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक विजय वाजे यांचा नवीन वाद समोर आला होता.त्यात नगरपरिषदेच्या कर्मचारी संघटनेने आज नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन पाठवून,”काल दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास नगरसेवक वाजे हे विद्युत विभागात आले व त्यांनी त्या विभागातील प्रमुखास अवमानास्पद वागणूक दिली होती.त्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपमान झाला होता.शहर विकासात महत्वपूर्ण योगदान देण्याऱ्या कर्मचाऱ्यांचा वारंवार होणारा अपमान हि गंभीर बाब असून प्रत्येक वेळी काही नगरसेवकांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला होता.काही नगरसेवकांचे पती अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार दमबाज्या करत अपमान करत असल्याचा आरोप केला होता.त्यामुळे नगरपरिषदेत भीतीचे वातावरण पसरले होते.प्रत्येक काम करून घेताना दमदाटिचा पायंडा पडला असून हि बाब नक्कीच गंभीर असल्याचे म्हटले होते.या सातत्त्याने होणाऱ्या दमदाटीला अधिकारी व कर्मचारी वैतागले असल्याचा आरोप केला होता.त्यामुळे या नगरसेवकांवर जो पर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत आपण काल सायंकाळ पासून काम बंद आंदोलन करणार असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते.व त्या प्रमाणे आंदोलन सुरू केल्याने आज सकाळी पासून पाण्याची अत्यावश्यक सेवा वगळून हे आंदोलन सुरू झाल्याने कोल्हे गटाचे धाबे दणाणले होते.आज सकाळी दहा वाजेपासून नगरपरिषद कर्मचारी पालिका कार्यालयाच्या समोर एकत्र जमले होते व ,”जो पर्यंत नगरसेवक विजय वाजे माफी मागत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही” असे ठणकावले होते.त्याची गंभीर दखल भाजपच्या कोल्हे गटाला घ्यावी लागली होती.व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिष्टाई साठी गेटनेते रवींद्र पाठक व उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांना पालिकेत अधिकारी व कर्मचारी यांची दिलगिरी व्यक्त करण्यास पाठवले होते.त्या शिष्ट मंडळाने आधी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या दालनात दिलगिरी व्यक्त केली त्याला उपमुख्याधिकारी गोर्डे यांनी वाजे यांनीच समोर येऊन दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली होती मात्र यात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी मध्यस्थी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना समजावून सांगून तोडगा काढला मात्र या पुढे अशी दांडगाई खपून घेतली जाणार नाही थेट पोलीस कारवाई केली जाईल व आपण अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत राहू असे ठणकावले त्यास सर्वांनी मान्यता दिल्यावर ही सर्व मंडळी बाहेर कामबंद आंदोलन सुरू ठेवलेल्या आंदोलन कर्त्यांसमोर आले व गटनेते रवींद्र पाठक व उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हे आंदोलन संपल्याचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी जाहीर केले आहे.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,गटनेते विरेंन बोरावके,मंदार पहाडे,विवेक सोनवणे सर्व विभाग प्रमुख,व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close