जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मुलीचे मनाविरुध्द लग्न,आईचा आत्महत्येचा प्रयत्न !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आपल्या मुलीने आपल्या मनाविरुद्ध आंतरजातीय विवाह केल्याचा मनात धरून विवाहित मुलीच्या आईने मुलीच्या सासरी येऊन तिच्या घरात आत्महत्येचा प्रयत्न काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास केल्याने आई सुमनबाई पंडितराव थोरे हिचे विरुद्ध फिर्यादी मुलगी यशोदा प्रतीक कुलकर्णी (वय-२७) हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने दहिगाव बोलका परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी मुलगी यशोदा कुलकर्णी हिने काही दिवसापूर्वी आपल्या मर्जीने एका परजातीय मुलाशी आंतरजातीय विवाह केला आहे.त्याचा मुलीच्या घरच्या मंडळींना राग होता.व तो वेळोवेळी व्यक्त होता होता.त्याच कारणातून फिर्यादी मुलीची पुण्यात जामळवाडी रोड सिद्धिविनायक सोसायटी कात्रज येथे रहिवाशी असलेली महिला व फिर्यादी महिलेची आई हिला राग आला होता त्यातून हि दुर्घटना घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलगी यशोदा कुलकर्णी हिने काही दिवसापूर्वी आपल्या मर्जीने एका परजातीय मुलाशी आंतरजातीय विवाह केला आहे.त्याचा मुलीच्या घरच्या मंडळींना राग होता.व तो वेळोवेळी व्यक्त होता होता.त्याच कारणातून फिर्यादी मुलीची पुण्यात जामळवाडी रोड सिद्धिविनायक सोसायटी कात्रज येथे रहिवाशी असलेली महिला व फिर्यादी महिलेची आई हिला राग आला होता.व तिने वारंवार विरोध करूनही आपल्या मुलीने आपले ऐकले नाही याचा मनात राग धरून हि महिला नुकतीच आपल्या खाजगी नोकरीत असलेल्या मुलीच्या कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील घरी येऊन काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे सासरची सर्व मंडळी घाबरून गेले आहे.व मुलीने अखेर आपल्या आई सुमनबाई थोरे यांचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे.आत्महत्या करणाऱ्या महिलेला संत जनार्दन स्वामी रुग्णालयांत उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.महिलेची प्रकृती स्थिर आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आपल्या दप्तरी गु.क्रं.५५५/२०२० भा.द.वि.कलम ४४७,५०४,५०६ प्रमाणे फिर्यादी मुलीच्या आई सुमनबाई थोरे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close